भिवंडी ता.२६ (बातमीदार): माहेरहून हुंडा आणावा, यासाठी सासरच्यांकडून छळ होत असल्याच्या दोन घटना शहरातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल केला आहे.
शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीतील हसीनाबानो अन्सारीचा (२२) विवाह शांतीनगर परिसरातील पिराणी पाडा मेहबूब नगर मधील अतीकुर रेहमान सुफीयान अहमद अन्सारीशी झाला होता. पतीसह सासरच्या मंडळीने माहेरहून हुंडा म्हणून ५० हजार रुपये आणावेत, यासाठी तिला शारीरिक, मानसिक छळ दिला होता. या प्रकरणी पीडितेने शांतिनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, पोलिसांनी २५ एप्रिल रोजी पतीसह सासरची मंडळी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर दुसऱ्या घटनेत कोनगाव पोलिस ठाणे हद्दीतील जागृती सोष्टे (२७) यांनी सासरच्या मंडळींनी शारीरिक, मानसिक त्रास दिल्याची तक्रार दिली आहे. याप्रकरणी २६ एप्रिल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.