पनवेल, ता. २६ (बातमीदार) : पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात अनेक निष्पाप जिवांना प्राण गमवावे लागले. नाव आणि धर्म विचारून दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केले. या हल्ल्याचा निषेध करत देशातील शांतता अबाधित ठेवण्यासाठी आणि शांतता कायम राखण्यासाठी सकल मुस्लिम समाज पनवेलतर्फे शहरातून निषेध मोर्चा काढण्यात आला. या वेळी ‘पाकिस्तान मुर्दाबाद, आतंकवाद मुर्दाबाद’ अशा घोषणा देऊन निषेध व्यक्त केला.
पनवेल शहरातील मुस्लिम नाका येथील सुविधा मेडिकलजवळ सायंकाळी पाच वाजता मोर्चाला सुरुवात झाली. काळे झेंडे दाखवत, ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ अशा घोषणा देत मुस्लिम समाज या मोर्चात सहभागी झाला होता. दहशतवाद्यांनी नाव विचारून जो हल्ला केला, त्यामुळे भारतात मुस्लिम समाज बदनाम झाला आहे. मुसलमानांच्या नावाने उद्या कोणीही काहीही करू शकतो; परंतु भारतीय मुस्लिम नेहमीच देश हितासाठीच जगणार आहे, अशी प्रतिक्रिया मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मोर्चाचा समारोप करण्यात आला. या वेळी पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक बजरंग राजपूत यांनी बंदोबस्त ठेवला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.