मुंबई

कर्जतच्या प्रशासकीय भवनासमोरच अतिक्रमण

CD

प्रशासकीय कार्यालयासमोर अनधिकृत बांधकाम
पाणीपुरवठ्यासह वीजजोडणी; संबंधित विभागाकडून दुर्लक्ष
कर्जत, ता. २७ (बातमीदार) : कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. विशेष म्‍हणजे थेट प्रशासकीय भवनसमोरच काहींनी अतिक्रमण केल्याने आश्चर्य व्‍यक्‍त केले जात आहे. त्‍यामुळे प्रशासकीय कार्यालयासमोरील अनधिकृत टपऱ्या हटविण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.
कर्जत प्रशासकीय भवनसमोर नागरिक आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलनासह उपोषण करतात. आता या जागेवरच अतिक्रमण झाल्याचे दिसून येत आहे. या जागेवर अनधिकृत टपऱ्या उभारण्यात आल्या आहेत. विशेष म्‍हणजे त्‍यांना वीज तसेच पाणीपुरवठा जोडणी देण्यात आले आहे. त्‍यामुळे सर्वसामान्य नागरिकांना वीज, तसेच पाणीपुरवठा जोडणी मिळण्यास दिरंगाई होत असताना अशा अनधिकृत टपऱ्यांना मात्र तत्‍काळ प्रशासकीय सेवा उपलब्ध होत असल्याने रोष व्‍यक्‍त केला जात आहे. शिवाय प्रशासकीय भवनसमोरच जर अतिक्रमण होत असेल तर तालुक्यात इतरत्र होणाऱ्या अतिक्रमणांवर प्रशासन काय कारवाई करणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्‍थित केला जात आहे. शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. विशेष म्‍हणजे आता प्रशासकीय कार्यालयाजवळच असे अतिक्रमण वाढत आहे. त्‍यामुळे प्रशासनाने तत्‍काळ या जागेवरील अतिक्रमण काढावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. याबाबत तहसीलदार तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे विचारणा केली असता, दोन्‍ही विभागांकडून जबाबदारी ढकलण्यात येत आहे. तर तहसील आवारात बेकायदा उभ्या राहत असलेल्या या अनधिकृत टपऱ्यांआडून कोणता गैरव्यवहार होत आहे, याबाबत सविस्तर माहिती घेऊन मोठे आंदोलन उभे केले जाईल, असे भाजपच्या जिल्‍हा युवती प्रमुख सुषमा ढाकणे यांनी सांगितले.
.........................
या जागेची देखभाल सार्वजनिक बांधकाम विभाग करीत आहे. त्‍यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने यावर कारवाई करण्याची अपेक्षा आहे.
- धनंजय जाधव, तहसीलदार, कर्जत
------------------
या जागेची देखभाल तहसीलदार यांच्या अखत्यारीत येते. आमच्याकडे फक्त तांत्रिक कामे करण्याची जबाबदारी आहे.
- संजीव वानखेडे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, कर्जत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nandani Maharaj On Elephant : मंत्रालयातील बैठकीनंतर नांदणी मठाचे महाराज म्हणाले..., पुढची भूमिका काय?

Loan Against Mutual Funds: म्युच्युअल फंडवर कर्ज कसं घ्यावं? प्रक्रिया, पात्रता आणि जोखीम जाणून घ्या

Ration Card Correction : घरबसल्या मोबाईलवर दुरुस्त करा रेशन कार्डमधील चुका! जाणून घ्या एकदम सोपी ऑनलाइन प्रोसेस

Latest Maharashtra News Updates Live : पुणे पोलिस आयुक्तालयात गणेश मंडळांची बैठक सुरू, गणेश मंडळांच्या समस्या, सूचना यावर चर्चा

जवान तक्रार करतात का? Sunil Gavaskar यांनी गौतम गंभीरला शब्दांनी 'झोडले'; मोहम्मद सिराज, रिषभ पंतचे कौतुक पण...

SCROLL FOR NEXT