सुनील गावस्कर यांनी इंग्लंडविरुद्ध मालिकेतील मोहम्मद सिराजच्या कामगिरीचं जोरदार कौतुक केलं.
सलग पाच कसोट्यांत सिराजने सर्वाधिक १८५.३ षटकं टाकून २३ बळी घेतले.
गावस्कर यांनी वर्कलोड संकल्पनेवर टीका करत ही संकल्पना भारतीय क्रिकेटमधून हटवण्याची मागणी केली.
Mohammed Siraj praised for bowling in all five Tests: भारतीय संघाने इंग्लंड दौऱ्यावर केलेल्या अविश्वसनीय कामगिरीचे सारेच कौतुक करत आहेत. लिटल मास्टर सुनील गावस्कर यांनी दी ओव्हल मैदानावर मेरे देश की धरती हे गाणं गायलं अन् आनंद साजरा केला. पण, त्यांनी दुसऱ्याच दिवशी लेखणीतून मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचे ( Gautam Gambhir) अप्रत्यक्षपणे कान टोचले. गावस्कर यांनी सलग पाच कसोटी खेळणाऱ्या मोहम्मद सिराजचे कौतुक केले आणि संघासाठी ही भूक आवश्यक असल्याचे ते म्हणाले. सिराजचा आधार घेत गावस्करांनी वर्कलोड या संकल्पनेवर प्रहार केला आणि भारतीय जवानांचे त्यांनी उदाहरण दिले.