बेशिस्त वाहनचालकांवर बडगा
८०५ तळीराम वाहनचालकांचे परवाना रद्द, निलंबित;
२४५ दखलपात्र गुन्हे, २,५३९ कारवाया
मुंबई, ता. १ ः गेल्या चार महिन्यांत प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) ८०५ तळीराम वाहनचालकांचे परवपाने रद्द, निलंबित केले आहेत. ही कारवाई वाहतूक पोलिसांनी कारवाईसाठी पाठविलेल्या प्रस्तावांआधारे केली.
मद्याच्या नशेत वाहन चालवण्याची प्रवृत्ती दडपण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आक्रमक कारवाई सुरू केली आहे. त्यासाठी स्थानिक पोलिसांच्या मदतीने वाहतूक पोलिस नियमितपणे शहरात नाकाबंदी कारवाई करून प्रतिदिन हजारो वाहने आणि वाहनचालकांची झाडाझडती घेत आहेत.
परिणामी यावर्षी पहिल्या चार महिन्यांमध्ये नाकाबंदी कारवायांमध्ये मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या २४५ वाहनचालकांविरोधात भारतीय न्याय संहितेतील कलम १२५ नुसार दखलपात्र गुन्हे नोंदवण्यात आले, तर दोन हजार ५३९ चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यातील बहुतांश प्रकरणांमध्ये चालकांचे परवाने तात्पुरते निलंबित करावे, कायमस्वरूपी रद्द करावे, या कारवाईची मागणी करणारे प्रस्ताव वाहतूक पोलिसांनी आरटीओकडे पाठवले होते.
वाहतूक पोलिसांकडून नोंद होणारे गुन्हे मद्यपी वाहनचालकांना नोकरीच्या ठिकाणी, पासपोर्ट मिळविण्याच्या प्रक्रियेत अडचणीचा ठरू शकतो, शिवाय न्यायालयीन प्रक्रिया वेळखाऊ, खर्चिक ठरते. परवाना रद्द किंवा निलंबित झाल्यास संबंधित व्यक्ती वाहन चालवू शकत नाही. त्यामुळे ही कारवाई कठोर मानली जाते.
नियमांकडे दुर्लक्ष
नागरिकांचे अशा प्रकारे नुकसान करण्याची इच्छा नाही, मात्र दारूच्या नशेत वाहन चालवल्यास अपघाताची शक्यता अधिक असते. त्यात स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात येतो, या जनजागृतीस नागरिक भीक घालत नसल्याने अशा कठोर कारवाईशिवाय पर्याय नाही, अशी प्रतिक्रिया एका अधिकाऱ्याने दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.