मुंबई

वसईनगरीत विजयोत्सवाचा हर्षोल्लास

CD

वसई, ता. १२ (बातमीदार) : ढोल-ताशांचा गजर, लेझीमचा निनाद, भगवेमय वातावरण, नरवीर चिमाजी आप्पा आणि शूरवीरांची गाथा अशा ऐतिहासिक आठवणींना उजाळा देणारा विजयोत्सव वसईनगरीत आज सोमवारी (ता. १२) आनंदाने साजरा करण्यात आला. या वेळी मोठ्या संख्येने इतिहासप्रेमींसह नागरिकांनी सहभाग घेतला होता.

छत्रपती शाहू महाराज यांचे पेशवे श्रीमंत बाजीराव यांचे धाकटे बंधू नरवीर चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली स्वराज्यासाठी शूरवीरांनी जुलमी, अराजक सत्तेचे उत्तर कोकणातून समूळ उच्चाटन केले. पोर्तुगीजांच्या सत्तेविरुद्ध मिळवलेला भारतातील हा पहिलाच विजय होता. अशा या ऐतिहासिक विजयाचा हा २८७वा विजयोत्सव वसईत साजरा करण्यात आला. वसई जिंकण्यासाठी नरवीर चिमाजी अप्पांनी योगिनी वज्रेश्वरी देवीकडे प्रार्थना केली. तिच्या कृपेने वसईवर स्वराज्याचा भगवा फडकला व वसई पुन्हा सुखी-आनंदी झाली. या ऐतिहासिक विजयानिमित्त गेली १२ वर्षे वसई-विरार महापालिका, महाराष्ट्र पर्यटन विभागातर्फे वसई विजयोत्सवाचे आयोजन करीत आहे.

यंदादेखील वज्रेश्वरी ते वसई किल्ला मशालयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मोठ्या संख्येने दुचाकी आणि चारचाकीस्वारांनी सहभाग घेतला होता. वज्रेश्वरी मंदिरात धर्मसभेचे राष्ट्रीय सचिव पंडित हृषिकेश श्रीकांत वैद्य यांच्या हस्ते आरती करून मशालयात्रेची सुरुवात नरवीर चिमाजी अप्पांच्या व मावळ्यांच्या वेषातील वसईकर युवकांच्या हस्ते झाले. याप्रसंगी आमदार स्नेहा दुबे-पंडित, माजी महापौर राजीव पाटील, हार्दिक राऊत, सामवेदी समाजाचे सुनील नाईक, वाडवळ समाजाचे विलास चोरघे, राजेंद्र ढगे, रोहित नाईक, माजी नगरसेवक आदी मान्यवर उपस्थित होते.

शोभायात्रेमध्ये लेझीमचा थरार
पारनाका ते वसई किल्ला भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. ढोल पथक व लेझीमच्या तालावर अवघा परिसर डोलत होता. वसई गावात पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या हस्ते वसई किल्ल्यातील श्रीमंत नरवीर चिमाजी आप्पा स्मारकातील अश्वारूढ पुतळ्याचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. या वेळी आमदार राजन नाईक, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, तहसीलदार अविनाश कोष्टी, माजी महापौर नारायण मानकर, माजी उपमहापौर प्रकाश रॉड्रिग्ज यांच्यासह माजी नगरसेवक, विविध पक्षीय मंडळी व नागरिक उपस्थित होते.

वसई विजयोत्सवातून चिमाजी आप्पा, शूरवीरांचा इतिहास, संस्कृती परंपरा व पर्यटन माहिती, तसेच खाद्यसंस्कृती नागरिकांपर्यंत पोहोचवली जात आहे. महापालिकेच्या माध्यमातून हा स्तुत्य उपक्रम दरवर्षी उत्साहात साजरा करण्यात येतो, याचे समाधान आहे.
- नारायण मानकर, माजी महापौर

वसई किल्ल्यातील श्रीमंत नरवीर चिमाजी आप्पा स्मारकातील अश्वारूढ पुतळ्याचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. येथील इतिहास सर्वश्रुत व्हावा, यासाठी प्रशासनाकडून राबविण्यात येणारा वसई विजयोत्सव उपक्रम वाखाणण्यासारखा आहे.
- डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हाधिकारी

अनेक लेखक, कवी, इतिहासकार हे वसईच्या भूमीत जन्माला आले. नरवीर चिमाजी आप्पांचा इतिहास मोठा आहे. अनेक किल्ले आजही इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. त्यात विजयोत्सव वसईकरांना उत्साह निर्माण करीत आहे.
- राजन नाईक, आमदार

वसई विजयोत्सवानिमित्ताने वज्रेश्वरी येथून निघालेल्या मशाल यात्रेत नागरिकांनी हिरिरीने सहभाग घेतला व वसई गावातदेखील नागरिकांचा उत्साह दिसून आला. वसई-विरार महापालिका व राज्य सरकार चांगल्या पद्धतीने विजयोत्सव साजरा करते, त्यात सहभाग घेण्याचा योग आला.
- स्नेहा दुबे-पंडित, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

NHAI action on Toll Plaza: लष्करी जवानाला बेदम मारहाण प्रकरणात 'NHAI'चा संबधित 'टोल प्लाझा'ला जबरदस्त दणका!

Central Government: मोदी सरकार देणार १५ हजार रुपये, पोर्टल सुरू; असं करा रजिस्ट्रेशन

SCROLL FOR NEXT