मुंबई

कंत्राटी अग्निशमन जवानांच्या वेतनाची व्यथा

CD

दिनेश गोगी : सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. १८ : आम्ही अग्निशमन दलाचे कंत्राटी जवान असून तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे, असे निनावी पत्र एका कंत्राटी जवानाने शुक्रवारी (ता. १६) कंत्राटी कामगारांच्या भल्यासाठी लढणारे कायद्याने वागा लोकचळवळीचे राज असरोंडकर यांना पाठवले आहे. कृपया हा संदेश आयुक्त मनीषा आव्हाळे यांना पाठवा, अशी विनंतीही या पत्रात केली आहे. हे पत्र असरोंडकर यांनी व्हायरल केल्याने ६० कंत्राटी अग्निशमन दलाच्या जवानांच्या वेतनाची व्यथा समोर आली आहे.
तीन महिन्यांपासून म्हणजे मार्चपासून कर्मचाऱ्यांचे वेतन नाही. नाक्यावरील बिगाऱ्यालाही दिवस संपायच्या आणि त्याचा घाम सुकण्याच्या आत पगार मिळतो. परंतु, आम्हा फायरमनची किंमत ठेवलेली नाही. घरात लग्नकार्य आहे. कोणाच्या मुलाच्या शाळा चालू होत आहेत. पावसाळ्याचा खर्च, घरभाडे आहेत. घरातील आजारी वडिलधाऱ्यांचा खर्च, हे सगळे जाऊ द्या जगण्यासाठी पोटाला खावे लागते, त्यासाठीचा खर्चही उधाऱ्या करून चालवतोय. आता उधारीही मिळणे अवघड झाली आहे, अशा यातना पत्रात मांडण्यात आल्या आहेत. विभागप्रमुखांपासून ते आयुक्तांपर्यंत सगळीच अधिकारी मंडळी भावनाशून्य आहेत की काय? त्यांच्यातली माणुसकी आपली खुर्ची आणि पद सांभाळण्यात हरवली काय? असाच प्रश्न पत्रात उपस्थित केला आहे.
महाराष्ट्रात एक नंबर आयुक्त म्हणून आपले नाव झाले, त्याबद्दल अभिनंदन. परंतु, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगाराबद्दल आपण उदासीन आहात का? असा प्रश्नही केला आहे. दोन महिने पगार नाही, तरी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य चालू ठेवले आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रशासनाने चालवलेले हाल आपल्यापर्यंत पोहचवावे एवढाच प्रयत्न, असा प्रकाशझोत पत्रात टाकण्यात आला आहे.
हे ६० कंत्राटी अग्निशमन जवान १२-१३ वर्षांपासून अग्निशमन दलात कार्यरत आहेत. त्यांना सुरुवातीला पाच हजार रुपये मिळत होते. आता महिन्याला २० हजार रुपये मिळत आहेत. मात्र, तेही वेळेवर मिळत नसल्यामुळे संसारिक अडचणी येत असल्याची खंत जवानाने व्यक्त केली आहे.

न्याय मिळण्यासाठी लढा देणार
अग्निशमन दलाच्या जवानाने पाठवलेल्या पत्रामुळे त्यांच्या वेतनाची व्यथा समोर आली आहे. ६० कंत्राटी जवान हे त्यांच्या खांद्यावर धुरा सांभाळत असताना त्यांच्या वेतनाबाबतची उदासीनता चिढ आणणारी आहे. न्याय मिळण्यासाठी लढा देणार, असे कायद्याने वागा लोकचळवळीचे राज असरोंडकर यांनी सांगितले.

कंत्राटदाराच्या लेटलतीफमुळे उशीर
पुण्याच्या एका कंत्राटदारामार्फत ६० कंत्राटी जवान अग्निशमन दलात काम करत आहेत. मात्र, कंत्राटदाराच्या लेटलतीफमुळे वेतनाला उशीर होत आहे. अग्निशमन दलाच्या उपायुक्त डॉ. दीपाली चौगले यांच्या दालनात सोमवारी बैठक होणार आहे, अशी माहिती अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी सुरेश बोंबे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Imtiaz Jaleel : मटण- चिकन बंदीच्या निषेधार्थ इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; मुख्यमंत्र्याना निमंत्रण, म्हणाले- आज देशातील...

Latest Marathi News Live Updates : मंत्री पंकजा मुंडे यांनी आमदार अर्जुन खोतकरांना राखी बांधली

Water Security: महाराष्ट्राची जलसुरक्षा आणि सुरक्षितता सुधारून तसेच टिकवून ठेवण्यासाठी सार्वजनिक वित्तपुरवठा पूरक असलेल्या खाजगी वित्तपुरवठ्यात संभाव्य गुंतवणुकीच्या संधी

PMPML Bus : पीएमपीएमएलची पैशांची उधळपट्टी; बस नसलेल्या मार्गांवर लाखो खर्चून उभारले शेड

Shubman Gill कसोटीनंतर वनडे, टी२०मध्येही होणार भारताचा कर्णधार, BCCI कडूनही संकेत; वाचा असं कोण म्हणालं

SCROLL FOR NEXT