मुंबई

सेल बेस थेरेपीमुळे तरुण १० वर्षांनी चालला

CD

सेल बेस थेरपीमुळे तरुण १० वर्षांनी चालला
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : रायगड जिल्‍ह्यामधील महाड येथील २५ वर्षीय तरुण गेल्‍या १० वर्षांपासून ‘बेकर मस्क्युलर डिस्ट्रॉफी (स्नायुंचा आजार) या आजाराशी झुंजत होता. रुग्णाला चालणे, शारीरिक संतुलन राखणे शक्य नव्हते. स्टेमआरएक्स रुग्णालय अँड रिसर्च सेंटरचे संस्थापक आणि रिजनरेटिव्ह मेडिसिन एक्स्पर्ट डॉ. प्रदीप महाजन यांनी त्यांच्यावर यशस्वी उपचार केले. रुग्ण यश शरद शेख याला १५ व्या वर्षी स्नायुंसंबंधी विकाराने ग्रासले होते. सेल बेस थेरपीमुळे हा तरुण १० वर्षांनी चालू शकला.
खराब झालेले स्नायू जलद दुरुस्त करण्यासाठी आणि पुन्हा नव्याने तयार करण्यास मदत करण्यासाठी त्याला नैसर्गिक उपचार प्रथिने देण्यात आली. बरे होण्यास गती देण्यासाठी आणि सूज कमी करण्यासाठी त्याला विशेष ऑक्सिजन उपचार दिले. त्यानंतर लेसर आणि ऊर्जेवर आधारित उपचारांसह सौम्य व्यायाम केले. त्याचा मणका आणि हृदयाचेदेखील वारंवार निरीक्षण केले, असे डॉ. महाजन यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hadapsar Traffic Jam: अवघडयं...! हडपसरमध्ये तीन किलोमीटर वाहनांची रांग अन् लोक चक्क पाच तास 'ट्राफिक'मध्येच ताटकळले

Latest Maharashtra News Updates : संभाजी ब्रिगेडचे तहसीलदारांना निवेदन

Dhaka Air Force Plane Crash: बांगलादेश विमान दुर्घटना; मृतांचा आकडा आला समोर, लहान मुलांचाही समावेश, १६० जण जखमी

ENG vs IND, 4th Test: बुमराह खेळणार की नाही? सिराजने खरं काय ते स्पष्ट सांगितलं; आकाश दीपच्या दुखापतीवरही दिले अपडेट्स...

Georai News : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत गुरुजींचे चक्क दारू पिऊन ज्ञानार्जन; पालकांनी रंगेहाथ पकडले

SCROLL FOR NEXT