मुंबई

धाटाव एमआयडीसीत सी ट्रीपल आयटी पार्कची उभारणी

CD

धाटाव एमआयडीसीत सी ट्रीपल आयटी पार्कची उभारणी
युवकांना ‘एआय’ प्रशिक्षणाची संधी; १०५ कोटी रुपयांची तरतूद
रोहा, ता. २५ (बातमीदार) ः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने बीड, नांदेड, छत्रपती संभाजीनगरनंतर आता रायगड जिल्ह्यासाठी ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्युबेशन ॲण्ड ट्रेनिंग’ अर्थात ‘सी ट्रीपल आयटी’ केंद्र मंजूर झाले आहे. ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीने केंद्र मंजुरीचे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठविले आहे. टाटा आणि राज्य शासनाच्या सहकार्यातून रोहे तालुक्यातील धाटाव एमआयडीसी क्षेत्रात हे नवीन केंद्र उभे राहणार आहे. या केंद्रासाठी १०५ कोटी खर्च येणार आहे. यामुळे रायगड जिल्ह्यातील युवकांना उद्योगांच्या गरजेनुसार अत्याधुनिक ‘एआय’ तंत्रज्ञानासह रोजगाराभिमुख कौशल्यविकासाचे प्रशिक्षण मिळणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांमुळे गेल्या चार महिन्यांत राज्यात मंजुरी मिळालेले हे चौथे केंद्र आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्र लिहिल्यानंतर ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीने अवघ्या दोन आठवड्यांत बीड जिल्ह्यातील केंद्रास, तर दीड महिन्यात नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरच्या दोन केंद्रांना तसेच चार महिन्यांत रायगड जिल्ह्यातील रोह्याच्या या ‘सी ट्रीपल आयटी’ केंद्रास मंजुरी मिळाली आहे. रायगड जिल्ह्यातील रोहा (धाटाव) एमआयडीसीमध्ये होणाऱ्या या ‘सी ट्रीपल आयटी’ केंद्राच्या एकूण १०५ कोटींच्या खर्चापैकी ८९ कोटी रुपये टाटा कंपनीतर्फे, तर १६ कोटी रुपये राज्य शासन व जिल्हा प्रशासनातर्फे उपलब्ध करण्यात येणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केल्यानंतर अल्पावधीतच या चार ‘सी ट्रीपल आयटी’ केंद्रांना मंजुरी मिळाल्यामुळे युवकांना रोजगाराभिमुख अत्याधुनिक कौशल्य विकासाचे प्रशिक्षण मिळण्याचा तसेच जिल्ह्यामध्ये उद्योगपूरक वातावरण निर्माण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
.........................
दरवर्षी तीन हजार युवकांना संधी
रोह्यातील धाटाव एमआयडीसीत उभारण्यात येणाऱ्या या ‘सी ट्रीपल आयटी’ केंद्रामुळे जिल्ह्यातील, कोकणातील युवकांना ‘एआय’ वापरासह जागतिक दर्जाचे आधुनिक प्रशिक्षण, तांत्रिक कौशल्य विकासाची, रोजगार, स्वयंरोजगाराची संधी मिळणार आहे. उद्योग क्षेत्राला स्थानिक पातळीवर कुशल मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. कोकणातील नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासह अनेक उद्दिष्टांची पूर्तता या ‘सी ट्रीपल आयटी’ केंद्रामुळे होणार आहे. नव्या सेंटरमधून दरवर्षी तीन हजार युवकांना प्रशिक्षित केले जाणार आहे. त्यातून कोकणात उद्योगपूरक वातावरण निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
..................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhishek Banerjee Attack : अभिषेक बॅनर्जींवर जीवघेणा हल्ला; विटा-दगडं फेकत डोळे आणि छातीवर वार, ममता बॅनर्जींचा भाजपवर गंभीर आरोप, म्हणाल्या, सत्ताधारी खुनी...

Pune News: हिंजवडीतील IT कंपनी अचानक बंद? पगार नाही, चेक बाऊन्स... ७०० इंटर्न आणि कर्मचाऱ्यांचा वेतन घोटाळा उघड

Hero New Bike : पेट्रोल पंपावर जायचं विसरा! लॉन्च झाली Hero ची दमदार बाइक; 72km मायलेजसह जबरदस्त स्मार्ट फीचर्स, किंमत फक्त...

Gokul Politics : बंटी पाटलांना टक्कर देण्यासाठी महायुतीचा 'मास्टरस्ट्रोक'! 'गोकुळ'साठी कोरेंची मध्यस्थी अन् चंद्रकांतदादांनी काढला तोडगा, गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?

Akola RSS Office Attack Case: आरएसएस कार्यालय हल्ला प्रकरणात आमदार साजिद खान पठाण यांच्यासह १२ जणांची १६ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

SCROLL FOR NEXT