मुंबई

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्र ठरतय वरदान

CD

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्र ठरतेय वरदान
वाणगाव, ता. २४ (बातमीदार) : बदलत्या हवामानामुळे मधमाश्यांच्या वसाहतींवर आणि मध उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होत आहे. मधमाशी पालन हा शेतीपूरक आणि निसर्गस्नेही व्यवसाय आहे. बदलत्या हवामानानुसार योग्य उपाययोजना केल्यास मध उत्पादन वाढवता येते आणि मधमाश्यांच्या आरोग्याचे संरक्षणही करता येते. त्‍यामुळे मधमाशी पालन यशस्वी करण्यासाठी हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळ्यात योग्य काळजी घेणे आणि हवामानातील बदलांशी जुळवून घेण्यासाठी उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. मधमाश्यांच्या संरक्षणासाठी व संवर्धनासाठी पुढे आले पाहिजे. मधमाश्यांची शास्त्रीय माहिती घेऊन तिचे संगोपन करण्याचे तंत्र अवगत केले पाहिजे. पराग सिंचनामुळे शेती उत्पादनात वाढ होत असल्याने तसेच मध, मेण या बाबींपेक्षा उत्पादनातील वाढ हा महत्त्वाचा घटक मानून शेतकऱ्यांनी मधमाशी पालनाला सुरुवात करायला हवी, असे कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विलास जाधव यांनी सांगितले आहे.
कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिल येथे सातत्त्याने मधमाशी पालनबाबत प्रशिक्षण कार्यक्रम होत आहेत. त्याचा फायदा जिल्ह्यातीलच नाही तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना झाला आहे. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवार-गुरुवार असे दोन दिवस प्रशिक्षण आयोजित केले जाते. वर्षातून १२०० शेतकरी युवक प्रशिक्षित केले जातात. शिवाय मधमाशी पालनामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शेतकरी युवकांचा सन्मान केला जातो. त्यामुळे इतरांना प्रेरणा मिळते. कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत जिल्ह्यातील ४५ युवक मास्टर ट्रेनर झाले आहेत. ३६० लोकांनी मधमाशी पालन सुरू केले आहे. मधमाशी पालन तंत्रज्ञान प्रचार प्रसार यामध्ये निवजीवन फाउंडेशन, वयम, आरोहण, दीपक फाउंडेशन यासारख्या नामांकित स्वयंसेवी संस्था यामध्ये पुढाकार घेत आहेत. मधमाशी पालन प्रशिक्षणामुळे कोसबाड येथील कृषी विज्ञान केंद्राला एक वेगळी ओळख प्राप्त झाली आहे.
....................
परागीभवन म्हणजे काय?
मधमाशीला सामाजिक कीटक असे म्हटले जाते. मधमाशा समूह करून राहतात. त्यांच्या घराला पोळे असे म्हणतात. एका पोळ्यात हजारो मधमाशा असतात. मधमाशा त्यांच्या अन्नाच्या पूर्ततेसाठी फुलातील मकरंद आणि पराग गोळा करतात. मधमाशा एका फुलावरून दुसऱ्या फुलावर परागकणांचे स्थलांतर करतात, त्यामुळे फुलांची बीजधारणा व फलधारणा होते. त्यालाच परागीभवन असे म्हणतात. परागीभवनामुळे पीक उत्पादनात २५ ते ३० टक्के वाढ होते, हे शास्त्रज्ञांनी सिद्ध करून दाखवले आहे. त्यामुळे मधमाशा या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहेत.
...............
मधमाशी पालनामुळे रोजगारनिर्मितीला वाव असल्याने हा एक शेतीपूरक उद्योग म्हणून केल्यास ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. कष्ट केल्याने मधासारखा गोड पदार्थ निर्माण करता येतो, हे मधमाश्यांनी दाखवून दिले आहे. मधमाशी हा केवळ मानवासाठीच नव्हे तर संपूर्ण सजीवसृष्टीसाठी अतिशय महत्त्वाचा घटक आहे.
- डॉ. विलास जाधव, प्रमुख शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिल, डहाणू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोकण रेल्वेच्या शिल्पकाराला मानाचा मुजरा! सावंतवाडी स्टेशन ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ होणार; सरकारचा मोठा निर्णय

Monsoon Arrival Maharashtra : मॉन्सून आगमनाची तारीख बदलली, ८ ते १० जूनदरम्यान महाराष्ट्रात पाऊस; शेतकऱ्यांची अस्वस्थता वाढणार

‘चक दे इंडिया’ फेम रमाकांत दायमा यांचं निधन, आठवणीत कलाकार भावूक, चाहत्यांना धक्का

Latest Marathi News Live Update : जाचक अटी आणि ए ग्रेडच्या निकषामुळे शेतकऱ्यांना नाफेडला कांदा विकण्यात अडचणी

Farmers Gold Loan : खरिपाच्या भांडवलासाठी शेतकऱ्यांवर घरातील सोनं तारण ठेवण्याची वेळ; बँकांच्या कारभाराने भ्रमनिरास, कांद्यालाही मिळेना भाव!

SCROLL FOR NEXT