मुंबई

वळगणीच्या माशांसाठी खवय्यांची धडपड

CD

वळगणीच्या माशांसाठी खवय्यांची धडपड
पावसाचे पाणी शेतात दाखल; विक्रीतून आदिवासींना चांगले उत्‍पन्न
पोलादपूर, ता. २७ (बातमीदार) ः रायगड जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाल्यामुळे वळगणीच्या माशांसाठी खवय्यांची धडपड सुरू झाली आहे. आदिवासी बांधवांकडून येथील सावित्री, कामथी, ढवळी, चोळई नदीपात्रात दिवस-रात्र जाळे टाकून मासे पकडले जात आहेत. तसेच शेतामध्ये नदीचे पाणी शिरल्याने विविध पद्धतीने वळगणीचे मासे पकडून त्‍याच्यावर ताव मारला जात आहे. पावसाळ्यात या वळगणीच्या माशांना मोठी मागणी असते. त्यामुळे या माशांची चांगली विक्री होऊन आदिवासी बांधवांच्या हातात चांगले पैसे येतात.
यावर्षी मे महिन्यातच पोलादपूरकरांना पावसाने झोडपले आहे. त्यामुळे तालुक्‍यातील नद्या, नाले दुधडी वाहू लागले आहेत. नद्या, नाले वाहू लागले की, कोकणातील गावाखेड्यांसह सर्वांनाच आकर्षण असते ते म्हणजे वळगणीच्या माशांचे. नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने हे मासे शेतात, नाल्यात, व्हाळीत पोटात असलेली अंडी सोडण्यासाठी प्रवेश करतात. त्यामुळे यंदादेखील जोरदार पाऊस सुरू झाल्यानंतर येथील नदीतील माशे व्हाळेत, शेतात शिरले आहेत. पावसाच्या आगमनाने वळगणीसाठी पोलादपूरात खवय्ये सज्ज झालेली पाहायला मिळातात. त्‍यामुळे आदिवासी बांधवांकडून या माशांना जाळ्यात पकडले जाते. यासाठी झिला, मच्छरदाणी, पागीर आदींचा वापर केला जातो. हे मासे आकाराने लहान असल्याने जाळीचा आकारदेखील लहान असावा लागतो. तर काही हौशी छत्रीच्या सहाय्याने वळगणीचे मासे पकडतात. यावर्षीदेखील शिवडा, खवल, दांडाळी, वाम, पांडरुस, मळे असे विविध जातीचे अंड्याने भरलेले मासे खवय्यांसाठी पकडले जात आहेत. याची व्रिकीदेखील मोठ्या प्रमाणात होत असल्याने आदिवासी बांधवांच्या हातात चांगले पैसे येतात.
.........................
या माशांना चवच भारी !
नदीच्या गोड्या पाण्यातील अतिशय चवदार, लज्जतदार म्हणजे मळ्याचे मासे होय. रायगडमध्ये खवय्यांची पहिली पसंत म्हणजे मळ्याचे मासे. हे मासे विक्री करणाऱ्या महिला टोपलीतून घेऊन येतात. या टोपल्यांमध्ये मळ्याचे मासे दिसताच खवय्यांची झुंबड उडते. अवघ्या पाच मिनिटात संपूर्ण टोपली रिकामी होते. १८० ते २०० रुपये किलोने या माशांची विक्री होते.
..................
मासे पकडण्याच्या विविध पद्धती-
रायगड जिल्ह्यात महाड, पोलादपूर, माणगाव तालुक्यात वळगन मोठ्या प्रमाणात पकडली जाते. वळगण पकडण्याचे विविध पद्धती आहेत. नदीला जोडलेल्या छोट्याशा वाहळ्याच्या बाजूला बसून पगिर टाकून मासे पकडले जातात. तर अनेकदा उंचावरून खाली पडणाऱ्या मोरीच्या प्रवाहाजवळ झिलपद्धत लावून मासे गोळा केले जातात. तर शेतातील मोकळ्या जागेमध्ये माशाच्या हालचाली पाहून शांतपणे पागीर फेकले जाते. यामध्ये मोठा मासा पकडला जातो. तसेच वहाळे जवळ मच्छरदाणी छोटी-छोटी मासे पकडली जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : आजचा दिवस प्रत्येक हिंदू आणि मराठी माणसासाठी अत्यंत महत्त्वाचा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गुढीपाडव्यानिमित्ताने वक्तव्य

Pune Satara Highway: पुणे-सातारा महामार्गावर हरिश्चंद्री येथे तीन फूट पाणी; गारांसह जोरदार अवकाळी पाऊस, पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा!

Chandrashekhar Bawankule: राज्यातील जमिनींचे ‘मायक्रो झोनिंग’ होणार: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; मुद्रांक सुधारणा विधेयक मंजूर!

India Pakistan Nuclear Risk : भारत-पाकिस्तान अणुयुद्ध कधीही पेटू शकते, कोणी केला खळबळजनक दावा?

Panchang 19 March 2026: आजच्या दिवशी बृहस्पती कवच स्तोत्राचे पठण आणि ‘बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT