मुंबई

नालेसफाई कामांची झाडाझडती

CD

भिवंडी, ता. ३१ (वार्ताहर)ः शहरातील काही भागांमध्ये तासभर पडलेल्या पावसातच पाणी साचल्याचे प्रकार घडले होते. या घटनांचे गांभीर्य लक्षात घेत आयुक्त अनमोल सागर यांनी गुरुवारी शहरातील नालेसफाईच्या कामाचा आढावा घेतला आहे.
शहरातील प्रभाग समिती क्रमांक चार येथील काकूबाई चाळ, आझमीनगर, मुख्य रस्त्यावरील टोरेंट ऑफिस येथील नाल्याची पाहणी केली, तर प्रभाग समिती क्रमांक दोनमधील गोपाळनगर, साईबाबा, रांजणोली नाका टाटा आमंत्रा येथील नाल्याची पाहणी केली. प्रभाग समिती क्रमांक एक व पाचमधील मेट्रो हॉटेलजवळ नाल्याची पाहणी केली. या वेळी पावसाळ्यात गोपाळनगर, कल्याण नाका, म्हाडा कॉलनी, चाविंद्रा नाका येथे पाणी भरण्याची शक्यता असते, अशा ठिकाणांना भेट देऊन पाणी साचणार नाही, याकरिता संबंधितांना सूचना दिल्या. या वेळी उपायुक्त (आरोग्य) विक्रम दराडे, शहर अभियंता जमील पटेल, बांधकाम अतिरिक्त शहर अभियंता सचिन नाईक, उपअभियंता (बांधकाम) हरेश म्हात्रे, आरोग्य विभागप्रमुख फैसल तातली, प्रभाग अधिकारी मकसुम शेख, गिरीष घोष्टेकर, बाळाराम जाधव, मुख्य आरोग्य अधिकारी जे. एम. सोनावणे, हरेष भंडारे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोकण रेल्वेच्या शिल्पकाराला मानाचा मुजरा! सावंतवाडी स्टेशन ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ होणार; सरकारचा मोठा निर्णय

Monsoon Arrival Maharashtra : मॉन्सून आगमनाची तारीख बदलली, ८ ते १० जूनदरम्यान महाराष्ट्रात पाऊस; शेतकऱ्यांची अस्वस्थता वाढणार

Yavatmal Diesel Supply : शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ट्रॅक्टरच्या टाकीसह 40 लिटरच्या कॅनमध्ये मिळणार डिझेल; जिल्हाधिकाऱ्यांचे पेट्रोल पंपांना थेट आदेश

Latest Marathi News Live Update : जाचक अटी आणि ए ग्रेडच्या निकषामुळे शेतकऱ्यांना नाफेडला कांदा विकण्यात अडचणी

‘चक दे इंडिया’ फेम रमाकांत दायमा यांचं निधन, आठवणीत कलाकार भावूक, चाहत्यांना धक्का

SCROLL FOR NEXT