मुंबई

तोतापुरी आंब्याचा बाजारात तोरा

CD

तोतापुरी आंब्याचा बाजारात तोरा
खवय्यांकडून पसंती; भावातही वाढ

श्रद्धा गायकवाड : सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : मे अखेरीस अवकाळी पावसाने ठाणे जिल्ह्यासह कोकणाला झोडपून काढले. या पावसाचा फटका हापूस, केसरसारख्या आंब्यांच्या उत्पादनाला बसला असून, परिणामी प्रक्रिया उद्योग व व्यापारीवर्ग तोतापुरी आंब्याकडे वळले आहेत. दरवर्षी पावसाच्या सुमारास ही मागणी वाढते; मात्र यंदा अवकाळी पावसामुळे ती अपेक्षेपेक्षा अधिक वाढली आहे. फळांचा राजा असलेल्या हापूस आंब्याचा हंगाम यंदा लवकरच संपल्याने बाजारपेठेत तोतापुरी, बदामी, लालबाग आंबा विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. परवडणाऱ्या भावात हे आंबे मिळत असल्याने ग्राहकांकडून त्‍यांना पसंती दिली जात आहे.

सर्वसाधारणपणे तोतापुरी आंबा पाऊस पडल्यानंतर बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल होतो. यावर्षी शहरातील फळविक्रेत्यांनी महिनाभर अगोदरच तोतापुरी आंबा विक्रीसाठी आणला आहे. वाशी मार्केटमध्ये हा आंबा वर्षभर उपलब्ध असतो, मात्र हापूस हंगामात त्याला मागणी नसल्याने फळविक्रेते आणण्यास तयार होत नाहीत; मात्र पावसामुळे हापूसचा हंगाम लवकर संपल्याने तोतापुरी लवकर दाखल झाला आहे.

तोतापुरी आंबा मुख्यतः रस, लोणचं, पल्प, स्क्वॅश व इतर प्रक्रिया उद्योगांमध्ये वापरला जातो. हापूस व केसर या दर्जेदार आणि चविष्ट आंब्यांपेक्षा तो स्वस्त असल्याने मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी तोतापुरीला पसंती दिली जाते. विशेष म्हणजे पावसामुळे झालेल्या नुकसानामुळे इतर आंब्यांचा पुरवठा घटला असून, भाव वाढले आहेत. अशा स्थितीत व्यापाऱ्यांनी व उद्योगांनी तोतापुरीला मोठ्या प्रमाणात मागणी सुरू केली आहे.

ठाण्यातील फळ व्यापारी अब्दुल अन्सारी सांगतात, हापूस आणि केसरसारखे आंबे आता महाग झाले आहेत. त्या तुलनेत तोतापुरी परवडतो आणि टिकतोही जास्त. त्यामुळे पावसाळा सुरू होण्याच्या आधीच त्याला मागणी वाढते. अवकाळी पावसामुळे यंदा ही मागणी लवकर आली. सध्या ठाण्यात दररोज सुमारे ५०० ते ८०० किलो तोतापुरी आंबा बाजारात विक्रीसाठी येतो. भावदेखील मागणीनुसार वाढले असून, सध्या तोतापुरीचे भाव १६०० ते ४५०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत आहेत. पुरवठा काहीसा मर्यादित असल्याने भाव अजून वाढू शकतात, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

अवकाळी पावसाचा अप्रत्यक्ष फायदा
बाजारातील चित्र पाहता पुढील काही दिवसांमध्ये तोतापुरी आंब्याची मागणी अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे उद्योगांना सातत्याने पल्प व रसासाठी कच्चा माल लागतो, तर दुसरीकडे हापूस-केसरसारख्या दर्जेदार आंब्यांचे प्रमाण कमी होत आहे. या साऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर तोतापुरी आंबा सध्या बाजारपेठेत ‘राजा’ बनला आहे. अवकाळी पावसाचा अप्रत्यक्ष फायदा तोतापुरीला झाल्याचे चित्र सध्या फळबाजारात स्पष्ट दिसून येत आहे.

उत्‍पादनात निम्म्याने घट
यंदा अवकाळीमुळे जिल्‍ह्यातील हापूस आंब्यालादेखील चांगला फटका बसला. त्‍यामुळे त्‍याच्‍या उत्‍पादनात निम्म्याने घट झाली. मार्केटमध्ये हापूस आंबा कमी दाखल झाल्याने त्‍याचे भाव चढेच राहिले होते. अगदी मेपर्यंत बाजारात हापूस किमान पाचशे रुपयांपर्यंत डझनाच्या भावात विकला जात आहे. त्‍यामुळे सर्वसामान्य खवय्यांनी अन्य देशी आंब्यांना पसंती दिली आहे. त्‍यामुळे देशी आंब्यांना बाजारात चांगली मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: अरे पळ, घे चेंडू खाली ठेवतो...! रवींद्र जडेजाने दिलेली खुली ऑफर, पण जो रूट निघाला 'शहाणा'; Video Viral

Jasprit Bumrah : Video - बुमराहने असाकाही भन्नाट बॉल टाकला, की जगातील तो टॉपचा बॅट्समनही त्याचा ‘बोल्ड’ पाहतच राहिला!

IND vs ENG 3rd Test: जो रूटने वाढवली भारताची चिंता! अनपेक्षित पाहुण्यांमुळे सारेच हैराण, पहिल्या दिवशी इंग्लंडचे वर्चस्व

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजने बॉल फेकून मारलाच होता, जो रूटवर खवळला; नेमकं काय घडलं?

Radhika Yadav: 'तो' वाद अन्...; टेनिस खेळाडू राधिका यादवला वडिलांनी का संपवलं? पोलिसांनी खरं कारण सांगितलं!

SCROLL FOR NEXT