मुंबई

मृत्यूच्या दाखल्यावर जातीचा उल्लेख बंधनकारक करावा

CD

उल्हासनगर, ता. ७ (बातमीदार) : काही दिवसांपासून समाज माध्यमांवर ख्रिस्ती लोक त्यांची अंतिम विधी हिंदू स्मशानभूमीत येऊन करत आहे. या विषयाला गांभीर्याने घेणारे ख्रिश्चन समाजाचे नेते व शिवसेना अल्पसंख्याक राज्य समन्वयक जितू राठोड यांनी उल्हासनगर महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे आणि पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांना दिलेल्या निवेदनात मृत्यूच्या दाखल्यावर हिंदू किंवा ख्रिस्ती असा उल्लेख बंधनकारक करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
हिंदू लिहिलेल्या व्यक्तीला कोणत्याही ख्रिस्ती कब्रस्तानात दफन करण्यात येत असेल किंवा ख्रिस्ती लिहिलेल्या व्यक्तीचा हिंदू स्मशानभूमीमध्ये अंतिम संस्कार केला जात असेल, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे जितू राठोड यांनी निवेदनात म्हटले आहे. ख्रिस्ती दफनभूमीमध्ये दफन होणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यू दाखल्यावर ख्रिस्ती असे स्पष्ट लिहिलेले असावे. ज्या चर्च व प्रार्थना घराचा तो सदस्य आहे, त्यांच्या लेटर पॅडवर स्पष्ट रीतीने त्यांनी लिहून द्यावे की हा व्यक्ती किती वर्षापासून त्यांच्या चर्च, प्रार्थना घराच्या सदस्य आहे, असे पत्र घेणे बंधनकारक ठेवण्यात यावे, अशी मागणीही राठोड यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vladimir Putin: रशियाचं पहिलं आण्विक क्षेपणास्त्र! मारा करण्याची अमर्याद क्षमता; कित्येक किलोमीटरपर्यंत होऊ शकतो विनाश

तेजश्री आणि सुबोधच्या मालिकेचं 'वीण दोघांतली ही तुटेना' गाणं चाहत्यांच्या पसंतीस उतरलं, अभिजीत-सावनीचं गोड ड्युएट गाणं ट्रेंडमध्ये

Jevali News : लिंगायत स्मशानभूमीच्या संदर्भात बोलावण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत जोरदार वादावादी; सहा जणांवर गुन्हा दाखल

Solapur News: हिप्परगा तलाव भरला, धोका वाढला! सोलापुरात २७ वर्षांनंतर पूरस्थिती निर्माण

Yermala News : मलकापूर येथील ह.भ.प.एकनाथ महाराज लोमटे यांची विनयभंगाच्या आरोपातुन निर्दोष मुक्तता; भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण

SCROLL FOR NEXT