मुंबई

उल्हासनगर स्थानकावर मूलभूत सुविधांचा अभाव

CD

उल्हासनगर, ता. १५ (वार्ताहर) : उल्हासनगर रेल्वे स्थानकावर रोज लाखो नागरिक प्रवास करतात; मात्र त्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधांचा दर्जा अत्यंत निराशाजनक आहे. बंद असलेले सरकते जिने, तोकडी सुरक्षा व्यवस्था, स्वच्छतेचा अभाव आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. अखेर ही नाराजी आवाजात रूपांतरित झाली आणि उल्हासनगर रेल्वे स्थानकावर स्थानिक प्रवासी, सामाजिक कार्यकर्ते आणि युवा प्रतिनिधींनी शुक्रवारी (ता. १३) एकत्र येत स्टेशन मास्तर सबिता नित्यानंद यांच्या उपस्थितीत बैठक घेतली.

या बैठकीत सर्वांनी स्टेशन परिसरातील समस्यांचा पाढा मांडला. या वेळी बंद असलेला सरकता जिना तातडीने सुरू करावा, होम गार्ड आणि आरपीएफची अपुरी उपस्थिती असल्याने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कर्मचारी वाढवावेत. शौचालय बंद असून प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरील स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे ती तत्काळ दुरुस्ती करून स्वच्छता कर्मचारी नेमावेत. स्थानकात प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी. आपत्कालीन सेवा म्हणून रुग्णवाहिका सुरू करावी. कचऱ्याचे डबे बसवून सफाई कर्मचाऱ्यांची उपलब्धता निश्चित करावी. प्लॅटफॉर्म क्रमांक १ ची उंची वाढवावी, अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाय करावे. टीसी व तिकीट तपासणी यंत्रणा अधिक सक्षम करावी. तिकीट खिडकी वेळेत सुरू ठेवावी. प्रवाशांना होणारा त्रास थांबवावा, अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी ॲड. प्रशांत चंदनशिव, मुकेश मखिजा, आकाश मेंजी, उमेश देबनाथ, युवासेना शहरप्रमुख सुशील पवार, रवी वर्मा आणि शिवनेरी फाउंडेशनचे रवींद्र मिंडे यांच्यासह प्रवासी प्रतिनिधी उपस्थित होते. आरपीएफ, जीपीआर कर्मचाऱ्यांनी सुरक्षेविषयी प्रवाशांची चिंता लक्षात घेत योग्य उपाययोजना करण्याचे संकेत दिले. ही बैठक केवळ समस्यांचे निदान नव्हते, तर भविष्यात रेल्वे प्रशासनाला नियमित उत्तरदायित्वाची जाणीव करून देण्याचा निर्धार होता.

महिनाभरात तोडगा काढणार
सर्व मागण्यांवर एका महिन्यात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल आणि दर महिन्याला एक आढावा बैठक घेऊन समस्यांवर सतत लक्ष ठेवले जाईल, असे आश्वासन स्टेशन मास्तर सबिता नित्यानंद यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nizamuddin Dargah: निजामुद्दीन दर्गा परिसरात मोठा अपघात; छत कोसळून ५ जणांचा मृत्यू

'सैराट' साठी तानाजी गळगुंडेला लाख नाही तर काही हजारांमध्ये मिळालेले पैसे; सगळे मित्राच्या हातात ठेवले कारण...

Latest Marathi News Live Updates: अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू, टेम्पो चालक ताब्यात

ED Raid on Congress MLA : मोठी बातमी! काँग्रेस आमदाराच्या ठिकाणांवर 'ED'चे छापे; कोट्यवधींचे सोने अन् रोकड जप्त

स्वातंत्र्यापूर्वीच्या नोटांवर गांधी नव्हे, नेताजींचा फोटो! आरबीआयच्या आधीची बँक कोणती? वाचा नेताजींच्या चलनाची अज्ञात कहाणी

SCROLL FOR NEXT