मुंबई

उन्हाळी सुट्टीने एसटीचे चांगभलं

CD

ठाणे शहर, ता. १५ (बातमीदार)ः वाहनचालक, वाहकांची कमतरता, साध्या डिझेल वाहनांची कमतरता असताना प्रवाशांनी उन्हाळी सुट्टीच्या हंगामात एसटीला अधिक पसंती दिली होती. अशातच नव्याने दाखल झालेल्या गाड्यांमुळे गतवर्षीचा १.८० कोटींचा तोटा भरून काढण्यात ठाणे एसटी विभागाला यश आले आहे.
ठाणे एसटी विभागातून महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांसह परराज्यातदेखील प्रवासी वाहतूक होते. कोरोनाकाळात एसटीने ठाणे, मुंबईत संकटात सापडलेल्या प्रवाशांना इच्छितस्थळी पोहोचवण्याचे काम केले. या काळात एसटीला आर्थिक तोटाही सहन करावा लागला. गेल्या वर्षी जवळपास १.८० कोटींची तूट होती. त्यामुळे एसटीला नफ्यात आणण्यासाठी विभाग नियंत्रक सागर पळसुले यांच्या नेतृत्वात आगार व्यवस्थापक, विभागातील सर्व अधिकारी, पर्यवेक्षक, प्रशासकीय कर्मचारी, वाहतूक नियंत्रक, चालक, वाहक तसेच यांत्रिकी कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमातून हा तोटा भरून काढण्यात ठाणे एसटी विभागाला यश आले आहे.
-----------------------------------------------------
प्रत्येक दिवसाचे नियोजन
- १५ एप्रिल ते १५ जून असा उन्हाळी ज्यादा वाहतूक कालावधी निश्चित करण्यात आला होता. त्या अनुषंगाने ठाणे विभागाकडून प्रत्येक दिवसाचे तिथीनिहाय नियोजन करून सर्व आगारांस देण्यात आले होते.
- चालक, वाहक यांची कमतरता तसेच गतवर्षीच्या तुलनेत साधी डिझेल वाहने कमी असतानाही उपलब्ध चालक, वाहक उपलब्ध मनुष्य बळ आणि वाहनांचा योग्य वापर करून घेत विभागाने प्रतिदिन १.९५ लाख किमी चालवून प्रतिदिन १.१४ कोटी उत्पन्न मिळवले. - ई-शिवनेरी सेवा तसेच ई-शिवाई सेवेला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. या सेवेतून ठाणे विभागास चार कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. नव्यानेच दाखल झालेल्या गाड्यांमुळे सेवेचे भारमाण सरासरी ८५ इतके झाले आहे.
----------------------------------------
३८.८१ लाख प्रवाशांचा प्रवास
ठाणे विभागाने दिलेल्या सेवेतून ३८.८१ लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. यामध्ये महिला सन्मान योजनेअंतर्गत १५.६८ लाख महिला असून, ७५ वर्षांवरील अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत १.९१ लाख प्रवाशांनी योजनेचा लाभ घेतला. तसेच ६५ ते ७५ या वयोगटातील ज्येष्ठ नागरिक सवलत योजनेअंतर्गत ( ५०% सवलत) १.२३ लाख प्रवाशांनी प्रवास केला आगे. प्रति किमी उत्पन्नात वाढ झाल्यामुळे ठाणे-१ आगार, ठाणे -२ आगार, भिवंडी आगारासह ठाणे विभाग नफ्यात येण्यास मदत झाली.
--------------------------------------------
विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच ३१ विभागांमध्ये ठाणे विभाग पहिल्या १० मध्ये आला आहे. यापुढेही अशाच प्रकारची कामगिरी करण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी केला आहे.
- सागर पळसुले, विभाग नियंत्रक, ठाणे जिल्हा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahadevi Elephant Video: महादेवी हत्तीने चिमुकल्याला वाचवलं? व्हिडिओ होतोय व्हायरल... सत्य काय?

Friendship Day 2025: मित्राला कधीही 'हे' 5 गिफ्ट देऊ नका, मैत्रीच्या नात्यात येऊ शकतो दुरावा

Mahadevi Elephant Protest : एक दिवस ‘महादेवी’साठी, नांदणीतून मूक मोर्चा निघाला, कसा असेल रूट; जाणून घ्या वेळापत्रक

Happy Friendship Day 2025: राशीनुसार गिफ्ट्स देऊन मित्रांना द्या सरप्राइज , मैत्री आणखी करा घट्ट

Pune News : अरुण सरनाईक यांचा उलगडला रुपेरी प्रवास, ‘पप्पा सांगा कुणाचे’ पाहून डोळे पाणावले; वडिलांना वाहिली अनोखी आदरांजली

SCROLL FOR NEXT