मुंबई

पालघर बातम्या

CD

पालघर जिल्ह्यातील करिष्मा बनली पहिली न्यूरोसर्जन
विरार, ता. २२ (बातमीदार) : जिल्ह्यातील वसई तालुक्यातील उमेळमान गावातील करिष्मा दयानंद आशालता किणी आगरी समाजातील पहिली न्यूरोसर्जन डॉक्टर बनली आहे. करिष्माचे माध्यमिक शालेय शिक्षण महाराष्ट्र इंग्लिश हायस्कूल तर उच्च माध्यमिक शिक्षण भवन्स कॉलेज, अंधेरी (मुंबई) येथे झाले आहे. तिने पुण्यातील भारती विद्यापीठातून एमबीबीएस पूर्ण केले असून, मुंबईतील जगजीवन राम हॉस्पिटलमधून इंटर्नशिप केली आहे. पी. डी. हिंदुजा नॅशनल हॉस्पिटल आणि एमआरसी येथून डॉ. एनबी न्यूरोसर्जरीमध्ये सुपर स्पेशालिटी पूर्ण करण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. करिष्मावर समाजातून, नातेवाईक व मित्रमंडळीकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आपले दिवंगत वडील दयानंद किणी (किणी ऑटो) यांची इच्छा पूर्ण केल्याचे करिष्माला समाधान वाटते. आपल्या पाठीशी वडिलांचे आशीर्वाद आणि आई व भाऊ यांचा खंबीर पाठिंबा असल्याने आपल्या यशाचे श्रेय करिष्मा त्यांना देते.
*****
जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना वह्या, पेनचे वाटप
विरार (बातमीदार) : दैवज्ञ सोनार ज्ञाती समाज, विरार संस्थेच्या माध्यमातून बोळिंज जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी वह्या, पेन व खाऊचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला उद्योजक चंद्रसेन धोंडे (वसंत ज्वेलर्स) आगाशी व उद्योजक दिनेश गिरधर (सत्पाळा), ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुचित्रा पितळे, बोळिंज येथील माजी नगरसेवक नितीन मुळे, अजित नाईक, संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार हाटकर, उपाध्यक्ष शशिकांत पावसकर, कार्याध्यक्ष जितेंद्र सत्पाळकर, सचिव मुकेश गिरधर, खजिनदार सानिका पितळे, कुंदन क्षीरसागर, संजय पोतदार, राजेंद्र नारकर, किशोर पितळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या, पेन व खाऊचे वाटप करण्यात आले. दैवज्ञ सोनार ज्ञाती समाजाने भविष्यात असेच समाजपयोगी कार्यक्रम राबवावे, अशा शाळेकडून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकेश गिरधर यांनी केले, तर आभार किशोर पितळे यांनी मानले.
******
‘मोफत बियाणे नको रे बाबा’
महाडीबीटी पोर्टल नोंदणीला २३ रुपये शुल्क ः शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड
जव्हार, ता. २२ (बातमीदार) : जिल्ह्यात पावसाला चांगली सुरुवात झाल्याने शेतकरीवर्ग शेतीच्या कामाला लागला आहे. शेतीशी निगडित महाडीबीटी पोर्टलवर विविध योजना कार्यान्वित आहेत. मात्र या पोर्टलवर शेतकरी नोंदणीसाठी अर्जाला प्रत्येकी २३ रुपये शुल्क येत आहे. यामुळे शेतकऱ्यांवर हा अधिकचा भार असल्याचे येथील आदिवासी बोलत आहेत.
महाडीबीटी पोर्टलवर विविध योजना प्रथम नोंदणी करणाऱ्यांना प्रथम प्राधान्य या अटीखाली शेतकऱ्यांना लाभ घेता येतो. मोफत बियाणे व खते योजनेतून सध्या बियाणे वाटप सुरू आहे. त्यासाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविले जात आहेत; परंतु याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याला ऑनलाइन प्रणालीत २३.६० पैसे इतके शुल्क भरावे लागत आहे. हा अर्ज भरताना शेतकऱ्यांना पोर्टल वापरण्याचे २० रुपये शुल्क तसेच राज्य व केंद्र शासनाचा प्रत्येकी नऊ टक्के जीएसटी भरावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एकूण २३.६० रुपये शुल्क भरावे लागत आहे. त्यासाठी पोर्टलवर पेमेंट करण्याचे सर्व पर्याय उपलब्ध आहेत. पण अर्ज केल्यानंतर तो कृषी विभागाकडून नामंजूर झाला तर पुन्हा नोंदणीची प्रक्रिया शेतकऱ्यांना करावी लागते. याचा भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

मोफत बियाण्यांसाठी ससेहोलपट
दरम्यान, पोर्टलचा सर्व्हरही अधूनमधून बंद पडत असल्याने शेतकऱ्यांची मोफत बियाण्यांसाठी ससेहोलपट होत असल्याचे चित्र आहे. अर्ज मंजूर झाल्याशिवाय शुल्क भरू नये, अशी तरतूद या पोर्टलवर हवी, अशी शेतकऱ्यांनी म्हटले आहे. तर अर्ज नामंजूर झाल्यावरही भरलेले शुल्क परत मिळणार नाही, असे पावतीवर लिहिले असल्याने ‘मोफत बियाणे नको रे बाबा’ म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

ऑनलाइन आयडी बंधनकारक
शेतकऱ्यांना योजनांचा लाभ देण्यासाठी शेतकरी आयडी काढणे बंधनकारक केले आहे. परंतु येथील शेतकरी मोबाईल वापरत असले तरीही पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने आयडी काढणे अनेकांना येत नाही. अशावेळी महा ई-सेवा केंद्रात जाण्याशिवाय पर्याय राहात नाही. काही शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने आयडी काढला तरी योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

शेतकऱ्यांना ऑनलाइन सुविधा महाडीबीटी पोर्टलवर उपलब्ध करून देऊन शासनाने चांगली सेवा दिली; पण यातील त्रुटी शेतकऱ्यांशी चर्चा करून दूर करणे आवश्यक आहे. तसेच सर्व्हर डाऊन होणे, दोनपेक्षा अधिक वेळा शुल्क भरण्याची प्रक्रिया बंद करायला हवी. एकदा शुल्क भरले की अर्ज मंजूर होईपर्यंत हेच शुल्क वापरायला हवे. कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर तोडगा काढणे आवश्यक आहे.
- रवींद्र गवते, शेतकरी

जव्हार तालुक्यात गावागावात शेतकऱ्यांचा गट तयार करून महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करता येते. यामुळे एकाच गटाच्या नावाने शुल्क भरण्यात येईल. शिवाय ज्या शेतकऱ्यांची नोंदणी पोर्टलवर होताना समस्या निर्माण होत असेल तर याकरिता ऑफलाइन सुविधा कार्यालयात सुरू केली आहे.
- जयराम आढळ, तालुका कृषी अधिकारी, जव्हार

स*स*स*स*स*स*स*स*स*स*स*स- *
बुडालेल्या व्यक्तींच्या शोधासाठी आधुनिक यंत्र
वसई-विरार पालिकेच्या अग्निशमन विभागात नवे यंत्र दाखल
विरार, ता. २२ (बातमीदार) ः पावसाळ्यात अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती उत्पन्न होते. तसेच वसईतील पर्यटनस्थळावरही अनेकांचा बुडून अपघात होतात. या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पालिकेच्या अग्निशमन विभागाने सात आधुनिक स्वरूपाची शोधयंत्र (सोनर स्कॅनर सर्च कॅमेरा) घेतले आहे. त्यामुळे पाण्यात बुडालेली व्यक्ती कोणत्या जागी आहे याची माहिती मिळेल व तिला बाहेर काढण्यास मदत होईल.
वसई-विरार शहरांत तुंगारेश्वर आणि चिंचोटी धबधबा, तलाव, विहिरी, खदाणी, नाले यासह अन्य पाण्याची ठिकाणे आहेत. विशेषतः पावसाळ्यात तलाव व खदाणी पाण्याने तुडुंब होत असल्याने मोठ्या संख्येने लहान मुले व तरुण मंडळी पोहोण्यासाठी पाण्यात उतरतात. काही वेळा पाण्याच्या खोलीचा व तेथील भागाचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडतात. यापूर्वीही शहरात पाण्यात बुडून मृत्यू होण्याच्या घटना घडल्या आहेत. अशावेळी अग्निशमन दलाला पाचारण करून शोधमोहीम राबविली जाते. मात्र नेमक्या कोणत्या भागात व्यक्ती किंवा मुलगा बुडाला आहे, याची माहिती मिळत नसल्याने शोध घेताना वेळ जातो. काही वेळा रात्र झाल्यानंतर ही शोधमोहीम थांबवावी लागते. अशा पाण्यात बुडालेल्याचा शोध जलदगतीने घेता यावा यासाठी अग्निशमन विभागाने सात नवीन आधुनिक स्वरूपाची शोध यंत्रं (सोनर स्कॅनर सर्च कॅमेरा) घेतली आहेत. त्यामुळे पाण्यात बुडालेली व्यक्ती किती खोलवर आहे. कोणत्या भागात बुडाली आहे याची माहिती या यंत्राद्वारे मिळते. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना पुढील शोधमोहीम राबविणे अधिक सोपे जाते. यात वेळही वाचणार असल्याचा दावा अग्निशमन विभागाने केला आहे.

अंडर वॉटर सोनर स्कॅनर यंत्रणा
सदर यंत्रणा ही पाणी क्षेत्रातील ५० मीटर खोलीपर्यंतचे घटक स्कॅन करते. यंत्रणेची पाणी क्षेत्रातील सभोवतालची स्कॅनिंग रेंज ही शॉर्ट १० मीटर, मध्यम २० मीटर आणि लांब ५० मोटर इतकी आहे. अंडर वॉटर सोनर स्कॅनर या उपकरणाचे वजन हे १.४ किलो इतके आहे. हे उपकरण पाणी क्षेत्रात पाण्याचा दाब सहन करण्याच्या परिमाणतेत आयपी ६८ प्रमाणित आहे. हे उपकरण बॅटरी ऑपरेटेड आहे. याद्वारे दुर्घटनास्थळाच्या सलग आठ तास स्कॅनिंग आणि १६ तास सर्च ऑपरेशन करता येणे शक्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Imtiaz Jaleel : मटण- चिकन बंदीच्या निषेधार्थ इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; मुख्यमंत्र्याना निमंत्रण, म्हणाले- आज देशातील...

Latest Marathi News Live Updates : मंत्री पंकजा मुंडे यांनी आमदार अर्जुन खोतकरांना राखी बांधली

Water Security: महाराष्ट्राची जलसुरक्षा आणि सुरक्षितता सुधारून तसेच टिकवून ठेवण्यासाठी सार्वजनिक वित्तपुरवठा पूरक असलेल्या खाजगी वित्तपुरवठ्यात संभाव्य गुंतवणुकीच्या संधी

PMPML Bus : पीएमपीएमएलची पैशांची उधळपट्टी; बस नसलेल्या मार्गांवर लाखो खर्चून उभारले शेड

Shubman Gill कसोटीनंतर वनडे, टी२०मध्येही होणार भारताचा कर्णधार, BCCI कडूनही संकेत; वाचा असं कोण म्हणालं

SCROLL FOR NEXT