मुंबई

दुर्मिळ आजाराने त्रस्त असणाऱ्या महिलेची प्रसूती यशस्वी

CD

दुर्मिळ आजाराने त्रस्त असणाऱ्या महिलेची प्रसूती यशस्वी
नवी मुंबई, ता. २ : हिमोफिलिया टाइप-३ या रक्ताशी संबंधित दुर्मिळ आजाराशी झगडत असणाऱ्या एका २८ वर्षीय महिलेने बाळाला सुखरूप जन्म दिला आहे. नाझनी खान असे या महिलेचे नाव आहे. कोपरखैरणे येथील कोकिळाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्‍वी पार करून बाळाला जीवनदान देण्यात आले.
वैद्यकीय अधिकारी डॉ. कुणाल गोयल यांनी याप्रकरणी माहिती देताना सांगितले, की रुग्णामध्ये रक्त गोठवण्याच्या घटकाची तीव्र कमतरता होती. आपोआप रक्तस्त्राव होण्याचा धोका कायम होता. अशावेळी सामान्य प्रसूतीदेखील प्राणघातक ठरू शकली असती. रक्तस्त्राव ताबडतोब थांबवणे इतकेच नव्हे, तर गर्भधारणा सुरक्षितपणे पूर्ण करणे हे रुग्णालयासमोर आव्हान होते. रुग्णाच्या तब्येतीवर बारकाईने लक्ष ठेवून गायनाकोलॉजी आणि क्रिटिकल केअर टीमसोबत काम करून सर्व घटकांची काळजी घेण्यात आली. नवव्या महिन्यात संपूर्ण टीमच्या समन्वयाने प्रसूतीचे काळजीपूर्वक नियोजन केले. हे एक अतिशय उच्च जोखीम असे वैद्यकीय प्रकरण होते. परंतु नियोजनासह आम्ही सर्वोत्तम शक्य परिणाम साध्य करून प्रसूती यशस्‍वी केली. त्‍यामुळे आई आणि बाळ दोघांचीही तब्येत आता उत्तम असल्याचे गोयल यांनी सांगितले. कोकिळाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात आम्ही दुर्मिळ आणि आव्हानात्मक प्रकरणांवर उपचार करण्यात आणि उत्कृष्ट परिणाम मिळवून देण्यात अग्रणी आहोत, असे रुग्णालयाचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत पवार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT