ठाकुर्ली पुलावर उडवली प्रतीकात्मक विमाने
काम रखडल्याने निषेध आंदोलन
डोंबिवली, ता. १ : डोंबिवली शहराच्या वाहतुकीसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या ठाकुर्ली रेल्वे उड्डाणपुलाचे काम मोबदल्याच्या अभावामुळे सुमारे आठ वर्षे रखडले आहे. या रखडलेल्या पुलाच्या निषेधार्थ सोमवारी (ता. ३०) मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने एकत्र येत कागदी आणि प्लॅस्टिकची प्रतीकात्मक विमाने उडवत आंदोलन केले.
ठाकुर्ली रेल्वे फाटक बंद झाल्याने डोंबिवलीत पूर्व व पश्चिम वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला आहे. सध्या कोपर उड्डाणपूल हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. या समस्येवर उपाय म्हणून कल्याणच्या दिशेने ठाकुर्ली उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन केले होते, परंतु हा पूल अतिशय अरुंद असून, अवजड वाहने या पुलावरून जात असल्यास अधिक कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी वाहतुकीचा भार चोळेगाव मार्गावर वाढला आहे. तिथेही कोंडीची समस्या जाणवते. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून ठाकुर्ली रेल्वे फाटकावरून सुरू झालेला पूल थेट म्हसोबा चौकात उतरण्याचे नियोजन महापालिकेने केले होते, परंतु मागील आठ वर्षांपासून हा पूल अर्धवट स्थितीतच आहे. पुलाची काही उभारणी ठाकुर्ली रेल्वेस्थानकापर्यंत झाली असली तरी पुढील काम पूर्णतः रखडले आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी मनसेचे शहर प्रमुख प्रकाश भोईर व शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे, माजी नगरसेविका सरोज भाईर, कोमल पाटील, रमा म्हात्रे, इत्यादींसह शेकडो शिवसैनिक आणि मनसैनिकांनी अर्धवट पुलावर एकत्र जमून प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या भोंगळ कारभाराचा तीव्र निषेध केला. आंदोलकांनी आपल्यासोबत प्लॅस्टिक आणि कागदाच्या प्रतीकात्मक विमानांचे संच आणले होते. त्या अर्धवट पुलावरून ही विमाने उडवत खाली टाकत सत्ताधाऱ्यांची खिल्ली उडवली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.