मुंबई

येऊरमधील आतषबाजी भोवली

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : वनक्षेत्र असल्याने संवेदनशील अशा येऊर परिसरात फटाके तसेच ध्वनिक्षेपकाचा वापर करणाऱ्या अमरिश ठाणेकर यांना महागात पडले आहे. त्यांच्याविरोधात वन्यजीवाला हानी होईल, अशा प्रकारची कृती केल्याने वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
कोपरी पूर्व येथील अमरिश ठाणेकर यांच्या वाढदिवसानिमित्त येऊर परिसरात शुक्रवारी (ता. २७) रात्री एका फार्महाउसवर धांगडधिंगाणा सुरू होता. तसेच वनक्षेत्र असल्याने फटाके, लाऊडस्पीकर वाजवण्यास बंदीचेही उल्लंघन करण्यात आले होते. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी गुन्हा दाखल करावा, असे निर्देश दिले होते. त्यानुसार वर्तकनगर पोलिस ठाण्यात अमरिश ठाणेकर यांच्याविरोधात वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ चे कलम ३२ व पर्यावरण (संरक्षण) कायदा १९८६ चे कलम १९, सह महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३३ एन डब्ल्यु १३१ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. तसेच फार्महाउस मालकावरही तपासानंतर गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती वर्तकनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचौरे यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT