मुरबाड, ता. १ (वार्ताहर)ः शालेय जीवनापासूनच बचतीची सवय लागावी, यासाठी मुरबाडच्या भूवन येथे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत ‘शालेय बचत बँक’ सुरू करण्यात आली आहे. या बचत बँकेत शुभारंभाच्या पहिल्याच दिवशी ४५ विद्यार्थ्यांनी ३,२५० रुपये जमा केले आहेत.
शाळेत येताना विद्यार्थ्यांना दररोज खाऊसाठी पैसे सोबत दिले जातात. या पैशांमधून मुले चिप्स, कुरकुरे आणि चॉकलेट खातात. यातून त्यांच्या दातांना कीड लागणे, उलटी होणे, पोटदुखी यासारखे आजार जडतात. त्यामुळे पालकांनी दिलेल्या पैशांचा विद्यार्थ्यांकडून अनावश्यक खर्च होतो. तसेच त्याचे दुष्परिणाम त्यांच्या शरीरावर होत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना ‘एक रुपया वाचवणे म्हणजेच एक रुपया कमावणे होय’ हे ब्रीद घेऊन शाळेतील उपक्रमशील शिक्षक दिलीप खाटेघरे यांनी विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबवला आहे. या माध्यमातून शैक्षणिक सहलींचा खर्च भागवला जाणार असून, खाऊवर वायफळ खर्चाऐवजी बचतीचे पैसे बॅंकेत जमा केले जाणार आहेत. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांच्या बँक व्यवहाराची माहिती स्वतंत्रपणे पासबुकात तसेच दैनंदिन व्यवहारांची नोंद वहीत ठेवली जात आहे.
---------------------------------
शैक्षणिक सहलींची तरतूद
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना बचतीची सवय लागणार आहे. तसेच बँक खाते, पासबुक, बँकेचे व्यवहारांची माहिती मिळणार आहे. तसेच उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आई-वडिलांकडून खाऊसाठी मिळालेले पैसे खर्च करण्याऐवजी खात्यात जमा होणार आहेत. त्यामुळे त्यांना बचतीची सवय लागली आहे. तसेच वर्षाअखेर किंवा सहलीअगोदर विद्यार्थ्यांनी जमा केलेले पैसे एकत्रित करून विद्यार्थ्यांना वाटप केले जातात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.