नवीन पनवेल, ता. १ (बातमीदार) : काळुंद्रे गावात पोलिसांनी अवैधरीत्या गुटखा विक्री करणाऱ्या दुकानांवर शनिवारी (ता. २८) धाडसत्र सुरू केले होते. विविध दुकानांची तपासणी केली असता तीन किराणा दुकानांमध्ये सुगंधी पानमसाला आणि गुटखा विक्री करताना आढळले. त्या ठिकाणाहून सर्व गुटखा पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतला. सर्वत्र गुटखा विक्रीवर बंदी असताना काळुंद्रे गाव आणि लगतच्या परिसरात काही जण छुप्या मार्गाने गुटखाविक्री करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांना मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विनोद लभडे, उपनिरीक्षक हजरत पठाण, हवालदार अविनाश गंथडे, नितीन वाघमारे, महेंद्र वायकर, परेश म्हात्रे, योगेश दिवेकर, सम्राट डाकी, चंद्रशेखर चौधरी, मीरा आंबेकर यांच्या पथकाने या तीन दुकानांतून हजारो रुपये किमतीचा गुटखा जप्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.