नवी मुंबई, ता. १ (वार्ताहर) : कोपरखैरणे वाहतूक पोलिसानी जून महिन्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात विशेष मोहीम राबवून दोन हजार ६५३ वाहनांवर कारवाई केली. वाहनचालकांना २६ लाख ७६ हजारांचा दंड ठोठावून त्यापैकी १० लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.
कोपरखैरणे वाहतूक शाखेकडून वाहतूक सुरक्षेबाबत, तसेच वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर नियमित कारवाई करण्यात येते. जूनमध्ये कोपरखैरणे वाहतूक शाखेने पोलिस उपायुक्त (वाहतूक) तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवून दोन ६५३ वाहनांवर कारवाई केली. तसेच या वाहनचालकांवर २६ लाख ७६ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावून त्यापैकी सुमारे १० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. कोपरखैरणे आणि घणसोली रेल्वेस्थानक परिसरातील वाहतूक समस्या नियंत्रित ठेवण्यासाठीदेखील कोपरखैरणे वाहतूक शाखेकडून विशेष उपाययोजना करण्यात आल्या. त्यामुळे स्थानिक नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या पुढील काळातदेखील वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात अशाच पद्धतीने कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वास भिंगारदिवे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.