मुंबई

शालेय विद्यार्थींनीमध्ये स्वसंरक्षण, सायबर जनजागृती

CD

नवी मुंबई, ता. १ (वार्ताहर) : करावे गाव येथील ज्ञानदीप शाळेतील इयत्ता पाचवी ते सातवीमधील सुमारे ७० ते ८० विद्यार्थिनींना वाहतूक नियम, सायबर सुरक्षितता व स्वसंरक्षण याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. सीवूड्स वाहतूक शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थिनींनी या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेऊन पोलिसांना प्रश्न विचारून संवाद साधला.
सीवूड्स वाहतूक शाखेकडून नेहमीच वेगवेगळे जनजागृतीपर उपक्रम व कार्यक्रम राबविण्यात येतात. सोमवारी (ता. ३०) सीवूड्स वाहतूक शाखेच्या वतीने करावे गाव येथील ज्ञानदीप शाळेमधील पाचवी ते सातवीतील विद्यार्थिनींसाठी विशेष प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहिनी लोखंडे यांनी वाहन चालविताना व रस्त्यावर पादचारी म्हणून वावरताना कोणते नियम पाळावेत, तसेच हेल्मेट वापराचे महत्त्व, दुचाकी वाहन चालवणाऱ्या पालकांनी नेहमी हेल्मेट वापरावे यासाठी विद्यार्थिनींना त्यांच्या पालकांना प्रोत्साहित करण्याचे आवाहन करण्यात आले. वाहन चालवताना कोणती काळजी घ्यावी, अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करावे, याचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले.
---------------
‘चांगला स्पर्श-वाईट स्पर्श’बद्दल मार्गदर्शन
विद्यार्थिनींच्या अनुषंगाने अत्यंत संवेदनशील विषय असलेल्या ‘गुड टच-बॅड टच’ या संकल्पनेची माहिती देण्यात आली व सुरक्षिततेचे महत्त्व पटवून दिले. महिला व मुलींनी छेडछाडीपासून स्वत:चे कसे संरक्षण करावे, कोणती पावले उचलावीत हे समजावून सांगितले. सायबर गुन्हेगार कोणत्या पद्धतीने ऑनलाइन फसवणूक करतात व त्यापासून स्वत:चे आर्थिक व वैयक्तिक संरक्षण कसे करावे याविषयीदेखील विद्यार्थिनींमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली.
--------------
शाळा बसचालकांचे प्रबोधन
सीवूड्स वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहिनी लोखंडे यांनी सीवूड्स येथील पोद्दार शाळेतील शाळा बसचालकांची बैठक घेतली. शाळेच्या बसचालकांनी कोणती काळजी घ्यावी, सुरक्षित वाहन कसे चालवावे, आपत्कालीन परिस्थितीत कोणती दक्षता घ्यावी, यासह वाहतुकीच्या नियमांबाबत त्यांच्यामध्ये प्रबोधन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं घडलं...

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

SCROLL FOR NEXT