नेरूळ, ता. १ (बातमीदार) : सारसोळे गाव येथील महापालिका शाळा क्रं १२मधील मराठी प्राथमिक शाळेत व सीबीएसई शाळा क्रं ९८मध्ये पूर्णवेळ मुख्याध्यापकाचे पद रिक्त आहे. या ठिकाणी तातडीने मुख्याध्यापक नियुक्त करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष महादेव पवार यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे केली आहे.
सारसोळे गावात महापालिकेची मराठी माध्यमाची व त्याच ठिकाणी चालविण्यात येणारी सीबीएसईची शाळा असुविधांमुळे व तेथील शैक्षणिक समस्यांमुळे गेल्या काही वर्षांपासून वादग्रस्त ठरलेली आहे. शिक्षकांची कमतरता, मुख्याध्यापकांचा अभाव, शैक्षणिक साहित्य मिळण्यास होणाऱ्या विलंबामुळे सारसोळेच्या महापालिका शाळा क्रं १२मधील प्राथमिक शाळा व सीबीएसई अभ्यासक्रमाची शाळा क्रं ९८ कायमच चर्चेमध्ये असतात. सध्या या दोन्ही शाळांमध्ये मुख्याध्यापकांचा अभाव असल्याने शालेय कामकाजात सुसूत्रतेचा व नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. या दोन्ही शाळांमध्ये मुख्याध्यापक तातडीने नियुक्ती होणे आवश्यक आहे. शालेय कामकाजातील सुसूत्रतेसाठी दोन्ही शाळांमध्ये तातडीने मुख्याध्यापक नियुक्त करण्याचे संबंधितांना तातडीने आदेश देण्याची मागणी महादेव पवार यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.