दिव्यात अनधिकृतपणे वर्षभर वीजचोरी; गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : वर्षभर अनधिकृतरित्या वीजजोडणी करून दोन लाख ८२ हजार रुपयांची वीजचोरी करणाऱ्या दिव्यातील अविनाश जोशी यांच्या विरोधात वीज अधिनियम २००३ चे कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ९ मे २०२४ ते ८ मे २०२५ असा वर्षभर घडला असून, यादरम्यान जोशींनी नऊ हजार १३७ युनिट चोरून वापर केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली.
दिवा पूर्व साबेगाव रस्ता येथील जोशी (वय ५२) यांनी जाणीवपूर्वक तेथे जवळ असलेल्या वितरण कंपनीच्या फ्युज कटआऊटमध्ये एक कोअर पिवळ्या व लाल रंगाची वायर जोडून वीज मीटरशिवाय अनाधिकृतरित्या वीजपुरवठा घेतला. वर्षभर ट्यूबलाइट, एलईडी, पंखा, फ्रिज, टीव्ही, वॉशिंग मशीन, एअर कंडिशनर, मिक्सर यांचा एकूण लोड दोन हजार ९५० व्हॅट वापरत असल्याचेही निदर्शनास आले. अशाप्रकारे वर्षभर विद्युत भार वापरून एकूण नऊ हजार १३७ युनिटचा वापर करून दोन लाख ८२ हजार ८९ रुपयांची वीजचोरी केली. तसेच पिवळ्या व लाल रंगाचा एक कोअर प्रत्येकी एक मीटर अनधिकृत केबल जप्त केली आहे. त्याविरोधात वितरण कंपनीचे कर्मचारी दीपीत चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वीज अधिनियम २००३ चे कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मुंब्रा पोलिस करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.