मुंबई

दिव्यात चोरट्यांचा सुळसुळाट

CD

दिव्यात चोरट्यांचा सुळसुळाट
एकाच रात्री चोरट्याने केली सात घरे साफ
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : दिवा येथील ग्लोबल शाळेच्या परिसरात एकाच दिवशी रात्रीच्या वेळेस चोरट्याने तब्बल सात घरांत शिरकाव करून त्या घरातून सोने-चांदी, रोख रक्कम आणि १० मोबाईल फोन घेऊन पोबारा केला आहे. यातील एका घटनेत चोरटा हाती लागण्यापूर्वीच किचन खिडकीच्या वाटे पळून गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. चोरट्यांचा या सुळसुळाटामुळे दिव्यात घबराटीचे वातावरण पसरले आहे.
दिवा, पूर्व या परिसरातील स्वामी समर्थ अपार्टमेंटमधील भावेश दैत यांनी दिलेल्या तक्रारीत, ते रविवारी (ता. २९) रात्रीच्या सुमारास राहत्या घराचा दरवाजा बंद करून कुटुंबासह झोपी गेले. मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास त्यांची पत्नी अचानक ओरडली. त्या वेळी त्यांच्या घराच्या स्वयंपाकघराच्या खिडकीचा आवाज आला. म्हणून उठून त्यांनी लाइट लावताच, एक अनोळखी तरुण खिडकीतून पळून जात असताना दिसला. दरम्यान, घरात पाहणी केली असता चोरट्याने त्यांच्या सोन्याचे मंगळसूत्रासह घरातील सोने-चांदीचे दागिने, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा ८८ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. दरम्यान, त्याच परिसरातील एकविरा अपार्टमेंटमधील सहा घरांत चोरट्याने चोरी केली. त्या घटनेत दीपाली सिंग, प्रवीण हरावडे, सुशांत करवळ, सुजल मोहिते, दिलीप सावंत आणि तुलु पारूल शेख यांच्या घरातून मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा सहा घरांतून एकूण एक लाख ७८ हजारांचा ऐवज चोरून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी मुंब्रा पोलिस तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT