ब्लिचिंग पावडर फवारणी करण्याची मागणी
तुर्भे (बातमीदार) ः नेरूळ सेक्टर २, ४ तसेच जुईनगर नोडमधील पदपथांवर ब्लिचिंग पावडर फवारणी करण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा काँग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी महापालिकेच्या नेरूळ विभाग अधिकाऱ्यांकडे एका निवेदनातून केली आहे. यंदा मेपासून नवी मुंबई शहरात पावसाने हजेरी लावली आहे. सध्या मुसळधार पाऊस सतत पडत आहे. सव्वा महिन्याच्या कालावधीत सतत पाऊस पडल्याने नेरूळ सेक्टर २, ४ आणि जुईनगर नोडमधील पदपथांवर शेवाळ साचण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे पदपथ निसरडे झाले असून, चालताना स्थानिक रहिवासी, विशेषत: महिला व ज्येष्ठ नागरिक पडून जखमी होत आहेत. त्यामुळे पदपथांवरून चालणाऱ्या स्थानिक रहिवाशांना कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये, दुर्घटना टळाव्यात यासाठी नेरूळ सेक्टर दोन, चार तसेच जुईनगर नोडमधील पदपथांवर ब्लिचिंग पावडरची फवारणी करण्याचे निर्देश संबंधितांना देण्याची मागणी विद्या भांडेकर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
...............
पदपथावरील राडारोड्यामुळे नागरिकांची गैरसोय
जुईनगर (बातमीदार) : सानपाडा रेल्वेस्थानकाला लागून असलेल्या सेक्टर ४ येथील रेल्वे पटरीलगत पदपथावर मोठ्या प्रमाणात राडारोडा पडून आहे. येथील खडी, झाडांच्या फांद्या आणि डेब्रिजमुळे नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. त्यामुळे येथील पदपथाची सफाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. खासगी कंत्राटदाराने बांधकामासाठी आणलेली खडी कित्येक दिवस येथील पदपथावर पडून आहे. तुटके फर्निचर, गवत, कचऱ्याचे ढीग, नारळाच्या झाडाच्या फांद्या यांनी जवळपास १०० मीटर पदपथ काबीज केल्याने चालावे कुठून, असा सवाल नागरिक करीत आहेत. शिवाय इतर पदपथावर शेवाळ साचल्याने अपघाताचा धोका आहे. या परिसरात बैठ्या चाळी आहेत. त्यामुळे सतत बांधकामे सुरू असतात. पदपथांवर रेती, खडी व विटा पडलेल्या असतात. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरूनच चालावे लागते. या रस्त्यावरून वाहने वेगाने धावत असतात. त्यातच नवी मुंबईत सध्या रस्त्यावरून चालताना दुचाकीस्वारांकडून महिलांचे दागिने चोरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रहिवासी शक्यतो पदपथाचा वापर करतात. मात्र येथील पदपथावर राडारोडा पडल्याने तो तत्काळ उचलण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.