मुंबई

सेंद्रिय शेती प्रकल्पात ठाणे महापालिकेचे पाऊल

CD

सेंद्रिय शेती प्रकल्पात ठाणे महापालिकेचे पाऊल
पातलीपाडा येथील दीड एकर क्षेत्र बहरले
कृषिदिनी ठाणे महापालिकेची ठाणेकरांना अनोखी भेट
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : मेट्रोच्या दिशेने स्मार्ट झेप घेत असलेल्या ठाणे महापालिकेचे कृषी क्षेत्रातही पदार्पण झाले आहे. पालिकेच्या उद्यान आणि वृक्ष विभागाने पातलीपाडा येथे सेंद्रिय शेती प्रकल्प सुरू केला असून, मंगळवारी (ता. १) कृषिदिनाच्या औचित्याने तो ठाणेकरांसाठी खुला केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या सेंद्रिय शेती प्रकल्पांतर्गत तांदूळ आणि नाचणीची पिके घेतली जात असून, विविध प्रकारच्या फळझाडांचीही लागवड केली आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पामध्ये ठाणेकरांनाही सहभाग घेता येणार आहे.
ठाणे महापालिकेतर्फे फेब्रुवारी महिन्यात आयोजित केलेल्या वृक्षवल्ली प्रदर्शनाचे उद्‍घाटन करताना एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना आदर्श म्हणून सेंद्रिय शेती प्रकल्पाचे निर्देश दिले होते. त्यानुसार महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभागाने पातलीपाडा येथे सुमारे दीड एकर क्षेत्रात हा प्रकल्प विकसित केला. याचे काम एप्रिल-२०२५मध्ये सुरू झाले. कृषिदिननिमित्त अनौपचारिक लोकार्पण करण्यात आले. आता हा प्रकल्प नागरिकांसाठी खुला असल्याची माहिती उद्यान अधीक्षक केदार पाटील यांनी दिली. याचे व्यवस्थापन उद्यान विभागामार्फत करण्यात येत आहे. सेंद्रिय शेती प्रकल्पामुळे विद्यार्थी व नागरिकांना नैसर्गिक शेती, पिके, भाजीपाला, फळझाडे, सेंद्रिय खताचा वापर आणि पाण्याचे व्यवस्थापन यासंबंधी माहिती व प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. तसेच शेतीचे महत्त्वही समजून घेता येईल, असेही पाटील यांनी सांगितले.

प्रकल्पात काय?
विविध प्रकारचा भाजीपाला व पालेभाज्यांची लागवड केली आहे. त्यात वांगी, भेंडी, टोमॅटो, मका, मिरची, ढोबळी मिरची, हिरवा व लाल कोबी, भुईमूग, रताळे, सुरण, लाल माठ, मेथी, कारले, दोडका, शिराळी, भोपळा अशा वेलवर्गीय भाज्यांचा समावेश आहे. तर फळझाडांमध्ये आंबा, लिंबू, चायनीज लिंबू, अवाकॅडो, अंजीर, केळी, सीताफळ, लक्ष्मणफळ, डाळिंब, बुटका नारळ आदींची लागवड करण्यात आली आहे.

कृत्रिम तलावात मासेपालन
प्रकल्प क्षेत्रात कृत्रिम तलाव तयार करून त्यामध्ये वॉटर लिली व मासे सोडण्यात आले आहेत. भविष्यात यामध्ये कोंबड्या, गाई, शेळ्या, टर्की व बदकपालनाचा समावेश करण्याची योजना आहे.

उत्पादने अनाथाश्रम, वृद्धाश्रमांना देणार
हा उपक्रम समजोपयोगी व्हावा यासाठी या शेतामध्ये तयार होणारी सेंद्रिय उत्पादने अनाथाश्रम व वृद्धाश्रमांना देण्यात येणार आहेत. दरम्यान, महापालिकेच्या या प्रकल्पास सोमवार ते शनिवार १० ते ५ या वेळेत नागरिकांना भेट देता येईल. शाळांना विद्यार्थी भेटींचेही आयोजन करता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT