ऐरोली येथील अनधिकृत बांधकामावर पालिकेची कारवाई
वाशी, ता. २ (बातमीदार) ः ऐरोली सेक्टर-३ येथील अनधिकृत बांधकामावर पालिकेच्या वतीने धडक कारवाई करण्यात आली आहे. येथील घर क्रमांक एफ २०३ येथे वसंत साठे यांनी महापालिकेच्या परवानगीपेक्षा जास्त बांधकाम केल्याने तसा अहवाल नगररचना विभागाकडून प्राप्त झाला होता. त्यामुळे या अनधिकृत बांधकामास जी विभाग कार्यालयामार्फत नोटीस बजावण्यात आलेली होती. संबंधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविने आवश्यक होते, परंतु त्यांनी बांधकाम सुरू ठेवले होते. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबंधितांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर बांधकामावर तोडक कारवाई करण्यात आली. ही कारवाई आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे व उपआयुक्त (अतिक्रमण) डॉ. कैलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी सुनील काठोळे यांच्या नियंत्रणाखाली अतिक्रमण विभागाने केली. या धडक मोहिमेसाठी जी-विभाग कार्यालयातील अतिक्रमण विभागाचे अधिकारी-कर्मचारी, १० मजूर, दोन ब्रेकर तसेच अतिक्रमण विभागातील पोलिस तैनात होते.
...........
सीवूड्स येथे आर्ट संवाद कार्यक्रम
वाशी, ता. २ (बातमीदार) ः सीवूड्स येथील नेक्सस मॉल येथे कॉफीप्रेमींसाठी कॉफी, आर्ट व संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ५ जुलै रोजी दुपारी १ ते सायंकाळी ७ या वेळेत मोफत हा कार्यक्रम होणार आहे. मॅकडोनाल्ड्स इंडियातर्फे कॉफी संस्कृतीची ओळख होण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला आहे. या वेळी विविध सत्रेही आयोजित करण्यात आली असून, आंतरराष्ट्रीय कॉफीच्या विभिन्न मिश्रणांचा आस्वाद घेता येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.