भिवंडीत ‘लॉजिस्टिक हब’साठी समिती : उदय सामंत
भिवंडी, ता. २ (वार्ताहर) : ‘भिवंडी शहर व ग्रामीण परिसरात मालवाहतूक व्यवसायाला अपार संधी आहेत. या परिसरातील लॉजिस्टिक उद्योगाचा विकास करणे, त्यामधून अधिकाधिक रोजगार संधी उपलब्ध होतील हा दृष्टिकोन ठेवून भिवंडीत लॉजिस्टिक हब निर्मितीसाठी उच्चस्तरीय समिती बनविण्यात येणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली आहे. भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. या वेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उत्तर देताना ही घोषणा केली. उदय सामंत यांनी सांगितले की, ‘आशिया खंडातील सर्वात चांगला लॉजिस्टिक हब निर्माण होण्याची क्षमता भिवंडी शहर परिसरात आहे. येथील लॉजिस्टिक हबचा सुनियोजित विकास होण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात येईल. भिवंडी परिसरातील पायाभूत सोयीसुविधांचा मोठ्या प्रमाणावर विकास करून या भागातील शक्तीकेंद्र असलेल्या लॉजिस्टिक हबचा विकास करता येईल. या लॉजिस्टिक हबच्या
विकासासाठी समितीने सूचित केलेल्या शिफारशीनुसार धोरण ठरविण्यात येईल.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.