नालासोपाऱ्यात आढळला मृतदेह
बोळिंज, ता. २ (बातमीदार) : नालासोपारा रेल्वे स्थानकाबाहेर मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ माजली. रोटी हॉटेलजवळ मंगळवारी (ता. १) हा मृतदेह आढळून आला. या मृत व्यक्तीचे वय ३० ते ३५ वर्षे इतके असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, हा मृतदेह गेल्या अनेक दिवसांपासून येथे असल्याचे सांगितले जात आहे. अचानक या ठिकाणाहून दुर्गंधी येऊ लागल्याने नागरिकांचे लक्ष या ठिकाणी गेले. नागरिकांनी या ठिकाणी मृतदेह असल्याचे समजले तेव्हा त्यांनी त्वरित या घटनेची माहिती पोलिसांना दिली. नालासोपारा पश्चिम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हा मृतदेह ताब्यात घेतला. या मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम पोलिस करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.