प्रथमच प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
काँग्रेसच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये संघटनात्मक बांधणीवर भर दिला आहे. त्याचाच भाग म्हणून राज्यभरातील तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या प्रथमच प्रत्यक्ष मुलाखत घेऊन करण्यात येत आहेत. आतापर्यंत प्रदेशाध्यक्षांनी स्वत: मुलाखती घेऊन एकूण ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या आहेत.
पक्षात तळागाळात काम करणाऱ्या कार्यक्षम व मेहनती कार्यकर्त्यांना या माध्यमातून महत्त्वाच्या पदांवर काम करण्यासाठी संधी देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. काँग्रेसच्या पक्ष निरीक्षकांनी जिल्ह्यांचे दौरे करून स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून काही नावांची शिफारस प्रदेश काँग्रेसला केली होती. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या निवड समितीच्या मुलाखतींनंतर या नेमणुका करण्यात आल्या आहेत.
या निवड समितीत काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते आमदार विजय वडेट्टीवार, विधान परिषद काँग्रेस गटनेते आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष व काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान, खासदार चंद्रकांत हंडोरे, खासदार प्रणिती शिंदे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, कुणाल चौधरी प्रदेश उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील आदींच्या समावेश आहे.
...
येथील नियुक्त्या पूर्ण
आतापर्यंत अकोला ८, बुलडाणा १९ , चंद्रपूर २, जळगाव ८, सिंधुदुर्ग १, उल्हासनगर १, रत्नागिरी ६, ठाणे शहर ३, ठाणे ग्रामीण ५, अहिल्यानगर ३, सांगली २, पुणे २, सोलापूर १, अमरावती २, धाराशिव १, जालना ७, हिंगोली २, छत्रपती संभाजीनगर ६, बीड ३, यवतमाळ १ अशा नियुक्त्या करण्यात आल्या आहेत, तर उर्वरित नियुक्त्याही लवकरच केल्या जाणार असल्याचे प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन अॅड. गणेश पाटील यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.