मेट्रोच्या व्हॉट्सॲप तिकिटाला प्रतिसाद
मुंबई, ता. २ : महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे (एमएमएमओसीएल) चालवण्यात येणाऱ्या मेट्रो २ए आणि मेट्रो ७ या मार्गिकांवर प्रवाशांसाठी व्हॉट्सॲप तिकीट प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. त्याला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, मंगळवारी (ता. १) तब्बल ६० हजार ६११ प्रवाशांनी व्हॉट्सॲपद्वारे तिकीट काढत मेट्रोने प्रवास केला आहे. त्यामुळे वेळेबरोबरच कागदाची बचत होत आहे. दहिसर पूर्व ते डी. एन. नगर (मेट्रो २ए) आणि दहिसर पूर्व ते गुंदवली (मेट्रो ७) या दोन्ही मार्गिकेवर दररोज सुमारे तीन लाख प्रवासी दररोज प्रवास करतात. तिकीट काढण्यासाठी रांग लावावी लागू नये, तसेच कागदाची बचत व्हावी म्हणून ‘एमएमएमओसीएल’ने व्हॉट्सॲपद्वारे तिकीटसेवा उपलब्ध केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.