मुंबई

रुग्णांची प्रचंड गैरसोय

CD

रुग्णांची प्रचंड गैरसोय
अघई आरोग्य केंद्राच्या इमारतीला गळती
शहापूर, ता. २ (वार्ताहर) : येथील तानसा अभयारण्यातील अघई आरोग्य केंद्राच्या इमारतीला यंदा दुसऱ्या वर्षीदेखील पावसाच्या पाण्यामुळे गळती लागली. यामुळे येथे उपचारासाठी दाखल रुग्णांचे प्रचंड हाल झाले. धक्कादायक बाब म्हणजे मागील वर्षीदेखील रुग्णालयाच्या या इमारतीला पावसाळ्यात गळती लागली होती, मात्र इमारतीच्या गळतीबाबत काहीच उपाययोजना झाली नसल्याने यंदाही रुग्णांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे, तर बुधवारी (ता. २) उपचारासाठी दाखल रुग्णांनी रुग्ण प्रभाग सोडून हिरकणी कक्षाचा आसरा घेतला.
पावसाळ्यात रुग्णालयाच्या इमारतीला गळती लागत असल्याने मागील वर्षापासून आरोग्य अधिकाऱ्यांनी ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना वारंवार पत्रव्यवहार करून दुरुस्तीची मागणी केली, परंतु जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी याकडे सतत दुर्लक्ष केले. यामुळे रुग्णालयाच्या या इमारतीला यंदादेखील गळती लागली असून, अशाच परिस्थितीत रुग्णांना येथे उपचार घ्यावे लागत आहेत. याविरोधात तालुक्यात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीदेखील बुधवारी रुग्णालयाच्या गळतीची पाहणी केली. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी रुग्णालयाच्या गैरसोयीत लक्ष न घातल्यास आंदोलन करण्याचा इशारा श्रमजीवी संघटनेचे तालुका सचिव प्रकाश खोडका यांनी दिला आहे.

१०८ रुग्णवाहिका उपलब्धच नाही
अघई आरोग्य केंद्रात दिवसा व रात्री पावसाळ्याच्या कालावधीत मोठ्या संख्येने तातडीचे आणि जोखमीचे रुग्ण येतात. यासाठी १०८ रुग्णवाहिका येथे २४ तास उपलब्ध असणे आवश्यक आहे, मात्र याउलट येथे १०८ ही रुग्णवाहिका उपलब्धच नसल्याने तातडीचे आणि जोखमीचे रुग्ण अत्यावश्यक उपचारांसाठी ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय शहापूर तसेच सामान्य रुग्णालय ठाणे येथे पाठविण्यास नानाविध अडचणी येत आहेत. ही रुग्णवाहिका २४ तासांसाठी उपलब्ध व्हावी, अशी मागणी बुधवारी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी रमेश जाधव यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे केली आहे.


फोटो : आरोग्य केंद्रात पावसाच्या पाण्याच्या गळतीमुळे उपचारासाठी दाखल रुग्णांनी अखेर हिरकणी कक्षात आसरा घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT