मुंबई

खेवारे गावात आरव जलसिंचन प्रकल्प यशस्वी

CD

टोकावडे, ता. ३ (बातमीदार) : मुरबाड तालुक्यातील खेवारे गावात २०२३मध्ये ‘आरव जलसिंचन प्रकल्प’ उभारण्यात आला. हा प्रकल्पातून ‘शेतीसाठी पाणी’ या महत्त्वाच्या गरजेचा परिणामकारक मार्ग सापडला आहे. उपक्रमासाठी लोकसहभाग, शासकीय व राजकीय सहकार्य आणि सामाजिक कृतज्ञता निधी यांचा प्रभावी उपयोग करण्यात आला. यामुळे पर्यावरणपूरक ग्रामीण विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे.
वसुंधरा संजीवनी मंडळाच्या प्रेरणेतून आणि अध्यक्ष आनंद भागवत-पाणीवाले काका यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्यानंतर २०२४मध्ये शेतकऱ्यांसाठी ठिबक सिंचनाची सुविधा पुरवण्यात आली. ज्यामुळे पाण्याचा योग्य वापर शक्य झाला. यावर्षी संस्थेने पाच हजार फळझाडे लावण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे. आतापर्यंत आंबा, फणस, जांभूळ व बांबू अशा ३५०० झाडांची लागवड खेवारे व वैशाखरे गावात करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना यासाठी तारेचे कम्पा‍उंड आणि गुणवत्तापूर्ण कलमे पुरवण्यात आली. याच गावात मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागातील सहसचिवांपासून लिपिकांपर्यंतच्या २६ कर्मचाऱ्यांनी श्रमदान करून ३१ झाडे लावली. यामुळे ग्रामस्थांमध्येही प्रेरणा निर्माण झाली. वैशाखरे गावातही ही चळवळ प्रभावीपणे पोहोचली आहे.

‘एक वृक्ष माझ्या नावावर’ योजना
उद्योजक विश्वजीत नामजोशी यांनी २०२३मध्ये आपल्या मातोश्रींच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘जांभूळवन’ तयार केले. त्यातून प्रेरणा घेऊन यावर्षी ‘एक वृक्ष माझ्या नावावर’ या अभिनव योजनेची सुरुवात केली. यामध्ये एका वृक्षासाठी ५०० रुपये देणगी घेतली जाते आणि संबंधित व्यक्तीच्या नावाचा टॅग झाडावर लावण्यात येतो. योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, शेतकऱ्याच्या माळरानावर फलोत्पादक झाडांची ओळख निर्माण होत आहे.


खेवारे ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग, सहकार्य आणि संस्थेवरचा विश्वास यामुळेच आमचा उत्साह दुणावला आहे आणि हे परिवर्तन शक्य झाले.
- मिलिंद केळकर, वसुंधरा संजीवनी मंडळ, ठाणे

वसुंधरा संजीवनी मंडळाच्या सहकार्यामुळे आमचे खेवारे गाव लवकरच आदर्श, स्वयंपूर्ण आणि पर्यावरणपूरक गाव म्हणून नावलौकिक मिळवेल. आम्ही या संस्थेचे आभारी आहोत.
- डॉ. विलास सुरोशे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT