नालासोपारा, ता. २ (बातमीदार) : बांधकाम व्यावसायिकाच्या आत्महत्या प्रकरणात दोन पोलिस हवालदार आणि एका दलालाला बुधवारी (ता. २) अटक करण्यात आली. त्यांना वसई न्यायालयात हजर केले असता ७ जुलैपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
श्याम शिंदे, राजेश महाजन असे दोन पोलिस हवालदारांचे नाव असून, लजपत लाला असे अटक दलालाचे नाव आहे. जयप्रकाश चौहान, असे आत्महत्या केलेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. मंगळवारी (ता. १) दुपारी १ वाजता राहत्या घरात चौहान यांनी सुसाईड नोट लिहून गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या नोटमध्ये दोन पोलिसांची नावे लिहून ठेवले होती. याबाबत आचोळा पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करून, तिन्ही संशयित आरोपींना अटक केले आहे.
काय आहे प्रकरण?
नालासोपारा पूर्वेतील संयुक्त नगर येथे ओम श्रीजी दर्शन नावाच्या सोसायटीचे पुनर्विकासाचे काम सुरू आहे. या इमारतीच्या बांधकामात संशयित आरोपी दोन पोलिसांनी ५० लाखांची गुंतवणूक केली होती. त्यातील काही पैसे चौहान यांनी परत दिले होते, तर शिल्लक पैशांसाठी पोलिसांनी फोनवरून दबाव आणला असल्याने मानसिक त्रासातून आत्महत्या केली असल्याचा दावा करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.