मुंबई

सिध्दार्थ कॉलेजसाठी ६० कोटी देण्यास राज्य सरकारची टाळाटाळ

CD

‘सिद्धार्थ’साठी ६० कोटी देण्यास राज्य सरकारची टाळाटाळ
इमारत धोकादायक; विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या फोर्ट येथील सिद्धर्थ महाविद्यालयाच्या बुद्धभवन या हेरिटेज इमारतीला पुढच्या वर्षी ८० वर्षे पूर्ण होत आहेत. ही इमारत धोकादायक ठरली असून, इमारतीच्या नूतनीकरणासाठी तसेच ग्रंथांच्या डिजिटायझेशनसाठी ६० कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारने गेल्या वर्षी मंजूर केला आहे. मात्र हा निधी राज्य सरकारने अद्याप महाविद्यालयाला दिला नसल्याने या इमारतीच्या नूतनीकरणाचे काम रखडले आहे. शेकडो विद्यार्थी या महाविद्यालयात शिकत असून, त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या कल्याणासाठी नेमलेल्या संसदीय समितीचे अध्यक्ष डॉ. किरीट सोलंकी यांच्या नेतृत्वाखाली खासदारांच्या शिष्टमंडळाने सिद्धार्थ महाविद्यालयाच्या इमारतीची पाहणी केली. या इमारतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विपुल ग्रंथसंपदेचे जतन केले आहे. ग्रंथालयातील दुर्मिळ ग्रथांची पाहणीही या शिष्टमंडळाने केली. इमारतीला ८० वर्षे होत आली असून, राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने २०२२-२०२३ मध्ये या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे. इमारत धोकादायक स्थितीत असल्याने या महाविद्यालयाचे नूतनीकरण करून संवर्धन करावे. या कामाला तातडीने सुरुवात करावी, अशी सूचना स्ट्रक्चरल ऑडिटच्या अहवालात केली आहे. या इमारतीत सुमारे चार हजार विद्यार्थी शिकत असून, इमारत धोकादायक ठरल्याने विद्यार्थ्यांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला असल्याची माहिती प्राचार्य अशोक सुनतकरी यांनी केली.
...
महाविद्यालयाच्या इमारतीचे संवर्धन करणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दुर्बल घटकांसाठी सुरू केलेल्या महाविद्यालयाच्या या हेरिटेज इमारतीचे जतन झाले पाहिजे. प्रश्न विद्यार्थ्यांच्या जीविताशी संबंधित असल्याने राज्य सरकारने कोणतेही राजकारण मध्ये न आणता तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा.
- डॉ. अशोक सुनतकरी, प्राचार्य, सिद्धार्थ महाविद्यालय, फोर्ट, मुंबई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT