सिलिंडरच्या स्फोटात एक जण जखमी
घाटकोपर, ता. २ (बातमीदार) ः घाटकोपर परिसरातील गावदेवी मंदिराजवळील एका घरात गॅस सिलिंडर स्फोटात एक जण जखमी झाला. ही घटना गावदेवी येथील रामदास बाबा चाळ येथे घडली. जखमी ओमप्रकाश यादव याला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या आणि घाटकोपर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. या घरामध्ये बेकायदा रंगकाम कारखाना चालवला जात होता, असे सांगण्यात येत आहे. या घटनेत घराचे नुकसान झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.