वाहनांच्या धडकेत दोन ज्येष्ठ महिला जखमी
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३ : कल्याण-डोंबिवली शहरांच्या दोन वेगळ्या भागांत भरधाव वाहनचालकांनी दोन पादचारी वृद्ध महिलांना ठोकर दिली. यात महिला गंभीर जखमी झाल्या असून, याप्रकरणी मानपाडा आणि टिळकनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
डोंबिवली पूर्वेतील मानपाडा भागातील फिफ्टी फिफ्टी ढाब्यासमोरील रस्त्यावरून बुधवारी (ता. २) रात्री साडेआठच्या दरम्यान हौसाबाई धोंडिबा ठोसर (वय ९०) आणि त्यांची सून बाजारपेठेत खरेदीसाठी पायी चालल्या होत्या. रस्त्याच्या कडेने जात असताना अचानक सासू, सुनेच्या पाठीमागून एक दुचाकीस्वार भरधाव आला. त्याने काही कळण्याच्या आत हौसाबाई ठोसर यांना पाठीमागून दुचाकीने जोराची धडक दिली. या धडकेत हौसाबाई जमिनीवर पडल्या. यात त्यांच्या खुब्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्या कमरेच्या हाडाला चीर गेली आहे. हौसाबाई यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हौसाबाई यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप गोरे तपास करीत आहेत.
दुसरी घटना पत्री पुलाजवळील कचोरे गाव हद्दीत बुधवारीच घडली आहे. पत्री पूल भागात राहणाऱ्या खातिजा शेख (वय ६५) या दुपारी साडेबारा वाजता पत्री पुलाजवळील कचोरे गाव परिसरातून रस्त्याने पायी नातीला आणण्यासाठी शाळेत जात होत्या. या वेळी भरधाव असलेल्या एका कारचालकाने खातिजा यांना ठोकर दिली. यात खातिजा यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. खातिजा शेख यांनी टिळकनगर पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक एम. एस. बागड तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.