मुंबई

होमिओपथी डॉक्टरांना अॅलोपथीची मुभा नको

CD

होमिओपॅथी डॉक्टरांना
ॲलोपॅथीची मुभा नको

डॉक्टरांच्या संघटनेचा कडाडून विरोध

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने (एमएमसी) केवळ सहा महिन्यांच्या ब्रिज कोर्सनंतर सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजीचे (सीसीएमपी) प्रशिक्षण घेतलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथी उपचार करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला महाराष्ट्रातील वरिष्ठ निवासी डॉक्टर संघटनेने (एमएसआरडीए) तीव्र विरोध केला आहे. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत धोकादायक असल्याचा इशाराही दिला आहे.

३० जून २०२५ रोजी परिषदेने हा आदेश जारी केला असून १५ जुलैपासून नव्या पद्धतीने नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे. या निर्णयाविरोधात एमएसआरडीएने परिषदेला पत्र पाठवून आदेश तातडीने मागे घेण्याची मागणी केली आहे.
एमएसआरडीएने म्हटले आहे, की एमबीबीएस आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करणारे डॉक्टर आठ ते १२ वर्षे शिक्षण घेतात. अशा वेळी सहा महिन्यांच्या प्राथमिक प्रशिक्षणावर आधारित ब्रिज कोर्सने अ‍ॅलोपॅथी उपचारांची परवानगी देणे म्हणजे संपूर्ण वैद्यकीय शिक्षण प्रणालीच्या मूल्यांवरच घाला आहे.

औषधांची नावे पाठ करून डॉक्टर होता येत नाही. ती एक मोठी प्रक्रिया असते, असे स्पष्ट करून ‘एमएसआरडीए’ने वैद्यकीय शिक्षणातील शिस्त, दर्जा आणि रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केला आहे.
या प्रकारच्या ‘शॉर्टकट’ने दिली जाणारी वैद्यकीय मान्यता भविष्यात रुग्णांच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे हा निर्णय रद्द करून वैद्यकीय परिषद निवडणुका तातडीने घेण्यात याव्यात, अशी मागणी संघटनेने केली आहे.
-------
...तर बोगस डॉक्टर वाढतील!
परिषदेच्या या निर्णयामुळे बोगस डॉक्टरांचे प्रमाण वाढेल. त्यामुळे रुग्णांचा डॉक्टरांवरील विश्वास डळमळीत होईल आणि आरोग्य व्यवस्थाच कोलमडेल, असा इशारा महाराष्ट्र वरिष्ठ निवासी डॉक्टर संघटनेचे सरचिटणीस डॉ. सर्बिक डे यांनी परिषदेच्या अध्यक्षांना पाठवलेल्या पत्रात दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : लग्नाच्या आमिषाने तरुणीला रिसॉर्टवर नेलं, पीडिता तीन महिन्यांची गर्भवती राहिली अन्..., कोल्हापुरातील घटनेने खळबळ

धक्कादायक! 'रुग्णालयात उपचाराविना थांबवून ठेवलेल्या नवजातासह आईचा मृत्यू'; डॉ. देगावकरविरुद्ध गुन्हा दाखल

Solapur Crime: 'हरियानातून आलेला चोरटा जेरबंद'; एसटी स्टॅण्डवरून चोरला होता पावणेपाच लाख रुपयांचा ऐवज

Latest Maharashtra News Updates : उद्घाटनाआधीच उड्डाण पुलात खड्डे; नागपुरात सार्वजनिक बांधकामावर प्रश्नचिन्ह

Hadapsar Traffic : हडपसरमध्ये आजारापेक्षा उपचार भयंकर; मगरपट्टा पुलाखालील वाहतूक कोंडी टाळण्यासाठीचे नियोजन फसले

SCROLL FOR NEXT