
Vedanta’s Global CEO Resigns: अनिल अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील खनिज कंपनी वेदांता रिसोर्सेस लिमिटेडला मोठा झटका बसला आहे. कंपनीच्या बेस मेटल्स डिव्हिजनचे CEO क्रिस ग्रिफिथ यांनी अलीकडेच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रिफिथ 2023 मध्ये वेदांतामध्ये सहभागी झाले होते आणि त्यांनी दक्षिण आफ्रिका आणि नामीबियामधील झिंक खाणींसह कंपनीच्या आंतरराष्ट्रीय व्यवसायाची जबाबदारी सांभाळली होती. ते वेदांता इंटरनॅशनल बिझनेसचे प्रेसिडेंटही होते. मात्र, कंपनीने त्यांच्या जागी नव्या व्यक्तीची नेमणूक केली आहे की नाही, याबाबत अजून स्पष्टता नाही.