मुंबई

पारनाका येथे आज गुरुपौर्णिमा उत्सव

CD

कल्याण, ता. ९ (वार्ताहर) : पश्चिमेतील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, पारनाका या सेवा केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव गुरुवारी (ता. १०) साजरा होत आहे. मार्च २०२३मध्ये स्वामी महाराजांच्या प्रकटदिनी पारनाका सेवा केंद्रात आरती व इतर सेवांना सुरुवात झाली. २० टक्के अध्यात्म आणि ८० टक्के समाजकार्य या दिंडोरी प्रणित मार्गाच्या उक्तीनुसार पारनाका सेवा केंद्रात आध्यात्मिक सेवांबरोबरच सामाजिक उपक्रमही घेण्यात आले. दिंडोरी प्रणित मार्गातील १२ उत्सवाबरोबरच श्री दुर्गा सप्तशती पठण, श्री स्वामी चरित्र सारामृत पठण, श्री गुरुचरित्र पारायण, श्री नवनाथ पारायण, भागवत पारायण अशा विविध अध्यात्मिक सेवाही केंद्रात सातत्याने घेण्यात येतात. गुरुवारी होणाऱ्या गुरुपौर्णिमा उत्सवाच्या कार्यक्रमासाठी पारनाका केंद्रातर्फे कल्याणमधील सर्व भक्त, भाविक व सेवेकऱ्यांना आमंत्रित केल्याची माहिती पारनाका सेवा केंद्राच्या मुख्य प्रतिनिधी स्वाती पाचघरे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat Bridge Collapse | 2022 पासून इशाऱ्यांकडे दुर्लक्ष, वारंवार सूचना दिल्यानंतर... गुजरात पूल कोसळण्यामागची धक्कादायक माहिती!

Latest Maharashtra News Updates : कल्याण-डोंबिवलीत डेंगू आणि मलेरियाचा धोका वाढतोय

Pashan-Sus Road : पाषाण-सूस रस्त्यावर धोकादायक वाहतूक, दुभाजकामुळे तीन किमीचा हेलपाटा; उपाययोजनांची वाहनचालकांची मागणी

World Maternal Health Day 2025: मातृ सुरक्षा दिन 10 जुलै ला का साजरा केला जातो? जाणून घ्या महत्व

SIP Investment: फक्त 2,000 रुपयांची एसआयपी तुम्हाला बनवू शकते श्रीमंत; इतकी वर्ष करावी लागेल गुंतवणूक

SCROLL FOR NEXT