मुंबई

गायमुख घाटाने केली वाहतुकीची कोंडी

CD

गायमुख घाटाने केली वाहतुकीची कोंडी
चाकरमान्यांचे हाल, वाहतूक पोलिसांचीही डोकेदुखी
ठाणे शहर, ता. ९ (बातमीदार) ः तीव्र उतार, चढ आणि धोकादायक वळणाचा घाट म्हणून गायमुख घाटाकडे पाहिले जाते. वाहतूक कोंडीसाठी कारणीभूत ठरलेल्या या घाटावर रात्री उशिरापासून दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. फाउंटन चौकाजवळ रात्री उशिरा बंद पडलेल्या एका वाहनाचा फटकाही वाहतुकीला बसला. या कोंडीमुळे थेट मुंबई-अहमदाबाद महामार्गासह ठाणे-मुंबई महामार्गावर अवजड वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक पोलिसांना कोंडी दूर करण्यासाठी अथक परिश्रम घ्यावे लागले.
ठाणे-घोडबंदर महामार्गावर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. सकाळी ११ ते दुपारी चार आणि रात्री दहा ते सकाळी सात वाजेपर्यंत या मार्गावर अवजड वाहनांना परवानगी दिली आहे; मात्र या मार्गाच्या दुरवस्थेमुळे आणि अरुंद गायमुख घाटामुळे अनेकदा अवजड वाहने दिलेल्या वेळेत हा मार्ग मोकळा करीत नाहीत. त्यामुळे अनेकदा या मार्गावर अवजड वाहने अडकून पडतात. त्याचा परिणाम चाकरमान्यांना भोगावा लागतो.
मंगळवारी (ता. ८) रात्री सुमारे एक वाजता गायमुख घाटावर जड-अवजड वाहनांनी वाहतूक कोंडी झाल्याने या वाहनांच्या रांगा थेट कासारवडवलीपर्यंत पोहोचली होती. तर, दुसऱ्या वाहिनीवर गायमुख घाट ते फाउंटन चौकापर्यंत पालघर, वसई आणि गुजरातहून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांची कोंडी झाली होती. ही कोंडी दूर करताना वाहतूक पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली. सकाळी दहापर्यंत हा मार्ग कोंडीमुक्त झाला नाही. रात्री प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या एसटी महामंडळालाही या कोंडीचा फटका बसला.

वाहनचालक, प्रवाशांचे हाल
मध्यरात्री निर्माण झालेला वाहनांचा भार या कारणांमुळे मुंबई-अहमदाबाद मार्ग आणि घोडबंदर येथील गायमुख घाटात वाहनांच्या रांगा लागल्या. दोन्ही दिशांकडील वाहिन्यांवर कोंडी झाल्याने मुंबईहून वसई, बोरिवलीच्या दिशेने निघालेल्या आणि तेथून ठाण्यात वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांचे, प्रवाशांचे हाल झाले आहेत.

विरुद्ध दिशेने वाहने
पहाटे फाउंटन ते कासारवडवलीपर्यंत झालेल्या कोंडीतून सुटका करून घेण्यासाठी काही वाहनचालकांनी विरुद्ध दिशेने वाहने काढण्याचा प्रयत्न सुरू केल्याने यामध्ये आणखीन भर पडली. घोडबंदर मार्ग परिसरात राहणाऱ्या नागरिकांना पंधरा मिनिटांचे अंतर कापण्यासाठी एक तासाचा वेळ लागला.

काही तासांत झाले डांबरीकरण
कासारवडवली येथील उड्डाणपुलाचे उद्‍घाटन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते मंगळवारी दुपारी झाले. तत्पूर्वी या पुलाखालील दोन्ही बाजूंच्या वाहिनीवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. ते खड्डे प्रशासनाने अवघ्या काही तासांत कार्यक्रमासाठी बुजवले. त्यामुळे माजिवडा ते गायमुख घाटापर्यंत दोन्ही बाजूंना पडलेले खड्डे बुजविण्याकरिता एवढा विलंब का लागतोय, असा संतप्त सवाल या वेळी वाहनचालकांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra : गणेशोत्सव राज्याचा उत्सव, अधिवेशनात मोठी घोषणा; व्यवस्थेसाठी लागेल तेवढा निधी देऊ, सांस्कृतिक मंत्री काय म्हणाले?

Vedanta CEO Resigns: अनिल अग्रवाल यांच्या अडचणी वाढल्या; सीईओने दिला राजीनामा, कंपनीचे शेअर्सही घसरले

छांगूर बाबाचा भयावह कट उघड! 1500 हिंदू मुलींचं धर्मांतर करून रचला होता 'हा' डाव; त्यांच्यासोबत करणार होता...

Numerology Predictions: 'या' तारखेला जन्मलेल्या मुलींवर असते माता सरस्वतीची कृपादृष्टी, बोलणे ठरते शाप आणि वरदान

Bank Sale: फक्त 3 महिने...'या' सरकारी बँकेचे होणार खाजगीकरण, खरेदी करण्याच्या शर्यतीत कोण?

SCROLL FOR NEXT