मुंबई

सुपर स्वच्छ लीग मध्ये मानांकन टिकवण्यासाठी आयुक्त सरसावले

CD

मानांकन टिकवण्यासाठी आयुक्त सरसावले
स्वच्छ सर्वेक्षण २०२५ चा कृती आरखडा करण्याचा सूचना
वाशी, ता. २३ (बातमीदार) ः ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’ मध्ये नवी मुंबई महापालिकेला देशातील सर्वोत्तम स्वच्छ शहरांच्या सुपर लीगमध्ये मानांकन लाभले होते. सुपर स्वच्छ लीगमध्ये मानांकन टिकवण्यासाठी आयुक्तांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी विभागप्रमुखांची आढावा बैठक घेण्यात आली.
सुपर स्वच्छ लीगमधील मानांकन नागरिक, स्वच्छताकर्मींसह सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित असल्याचे नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी स्पष्ट केले. पुढील काळात आपले मानांकन टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने शहर स्वच्छतेत अधिकाधिक प्रगती करण्याची व नावीन्यपूर्ण प्रकल्प व उपक्रम राबविण्याची जबाबदारी वाढली असल्याचे आयुक्तांनी प्रतिपादन केले.
या आढवा बैठकीत अतिरिक्त आयुक्त सुनील पवार व डॉ. राहुल गेठे, प्रशासन विभागाचे उपआयुक्त शरद पवार, शहर अभियंता शिरीष आरदवाड व इतर विभागप्रमुख, विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता उपस्थित होते, तर आगामी ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२५’ ला सामोरे जाताना स्वच्छताविषयक करावयाच्या नियोजित बाबींचा कृती आराखडा आतापासूनच तयार करावा व त्याच्या कालबद्ध अंमलबजावणीचा कार्यक्रमही ठरवावा, असे निर्देश आयुक्तांनी या वेळी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telesurgery India : नागपूरच्या डॉक्टरांची कमाल! 1 हजार किलोमीटर दूरच्या 2 रुग्णांवर केली रोबोटिक टेलीसर्जरी; भारतातला पहिलाचा प्रयोग

Biotin Rich Foods For Hair Growth: केस गळणे थांबतच नाहीये? आहारात 'या' 5 गोष्टी समाविष्ट करा; लगेत दिसेल फरक!

Khutbav News : पंढरीच्या वारीमध्ये हरवलेले भगत आजोबा एक महिन्याने घरी परतले; गायकवाड यांच्या रूपात पंढरीचा पांडुरंग भेटल्याची भगत परिवाराची भावना

Latest Maharashtra News Updates : फोन टॅप होत असल्याने मंत्री स्वतःहूनच फोन बंद ठेवततात, अशी चर्चा सुरुय - रोहित पवार

Local Megablock: मुंबईकरांना करावा लागणार गर्दीचा सामना, मेगाब्लॉकचे वेळापत्रक जाहीर

SCROLL FOR NEXT