मुंबई

पावसाळ्यात पर्यटन व्यवसाय थंडावला

CD

पावसाळ्यात पर्यटन व्यवसाय थंडावला
नव्या हंगामासाठी श्रीवर्धनमधील व्यावसायिक सज्ज
श्रीवर्धन, ता. २६ (वार्ताहर) ः जून महिन्यापर्यंत श्रीवर्धनमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. त्यामुळे स्थानिक पर्यटन व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. पावसाळा सुरू झाल्यापासून मात्र पर्यटन व्यवसायात मंदी आली असून, सध्या व्यावसायिक नव्या हंगामाच्या तयारीत व्यग्र आहेत.
पावसाळ्यात पर्यटकांची संख्या कमी असते. यामुळे अनेक व्यावसायिकांनी खोल्यांची रंगरंगोटी, दुरुस्ती व परिसराचे सौंदर्यीकरण सुरू केले आहे. येणाऱ्या दिवाळी व हिवाळी सुट्ट्यांच्या हंगामात पुन्हा पर्यटकांची गर्दी होईल, अशी अपेक्षा आहे. समुद्रकिनाऱ्यावरील सुशोभीकरणामुळे श्रीवर्धनचे सौंदर्य अधिक खुलले आहे. जे. जे. स्कूल ऑफ आर्टने टाकाऊपासून टिकाऊ या संकल्पनेतून चारचाकी व दुचाकी वाहनांच्या स्पेअर पार्टपासून तयार केलेले खेकडा, कोळंबी यांची शिल्पे, मच्छीमार जीवनशैली दर्शविणारी कलाकृती, ओपन जीम, सेल्फी पॉइंट, पॅव्हेलियन आणि खुले प्रेक्षागृह पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. डिसेंबर महिन्यात श्रीवर्धन पर्यटन संस्थेच्या वतीने दोन ते तीन दिवसांचा बीच फेस्टिव्हल आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवात कोकणातील पारंपरिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल, तसेच स्थानिक कलाकारांना त्यांच्या कलागुणांचे सादरीकरण करता येईल, असे संस्थेकडून सांगण्यात आले आहे.
.................
चौकट :
महिला बचत गटांना रोजगाराची संधी
श्रीवर्धन शहरात १६४ महिला बचत गट कार्यरत आहेत. पर्यटकांच्या समूह दौऱ्यांमध्ये नाश्ता, चहा व भोजनाच्या ऑर्डर या गटांना दिल्या जातात. यंदा हंगाम समाधानकारक गेल्याने महिला गटांच्या उत्पन्नात वाढ झाली असून, त्यांना मोठ्या प्रमाणात काम मिळाले आहे.
...............
प्रतिक्रिया
या वेळचा हंगाम समाधानकारक गेला. दिवाळीपासून पर्यटक पुन्हा येऊ लागतील. त्याआधी खोल्यांची सजावट, परिसर सुशोभीकरण आणि अधिक चांगल्या सुविधा देण्यावर भर दिला जाईल.
- महेंद्र भोसले, पर्यटन व्यावसायिक, श्रीवर्धन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेल दरवाढीचा चौथा धक्का! सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

सकाळच्या गडबडीतही फिट राहण्यासाठी झटपट, हेल्दी आणि एनर्जीने भरलेला पीनट-बटर-बनाना रॅप, ५ मिनिटांत होतो तयार

आजचे राशिभविष्य - २५ मे २०२६

Panchang 25 May 2026 : पंचांग! सोमवारचे शुभ मुहूर्त, राहुकाळ, चंद्रबळ आणि धार्मिक विशेष जाणून घ्या

आजचे पंचांग आणि दिनविशेष - २५ मे २०२६

SCROLL FOR NEXT