मुंबई

सकाळच्या बातमीनंतर कचऱ्याचे साम्राज्य संपुष्टात; मात्र वाहनांनी परिसराचा घेतला ताबा

CD

मोकळ्या जागेचा वाहनांकडून ताबा
दै. ‘सकाळ’च्या बातमीनंतर कचऱ्याचे साम्राज्य संपुष्टात
कल्याण, ता. २६ (बातमीदार) : कोळसेवाडी येथील श्री स्वामी समर्थ मठाकडे जाणाऱ्या रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले होते. दै. ‘सकाळ’ने यासंदर्भात वृत्त प्रसारित केल्यानंतर आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमेपूर्वीच महापालिका प्रशासनाने गंभीरपणे दखल घेत संपूर्ण रस्ता स्वच्छ करून घेतला होता; मात्र आता या रस्त्यावर वाहनांनी जागा ताब्यात घेतल्याचे दिसून येत आहे.
कोळसेवाडी जुन्या जनता बँकेसमोरील नव्या मार्गिकेहून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, श्री स्वामी समर्थ मठ तसेच महापालिकेने उभारलेल्या नव्या इमारतीकडे जाता येते. दिवसभरात असंख्य रहिवाशांची विशेषतः भक्तांची पायी वर्दळ या भागातून असते. या रस्त्याशेजारी कचऱ्याचे भलेमोठे साम्राज्य पसरले होते. यामुळे पावसाळ्यात दुर्गंधीसह रोगराईला निमंत्रण दिले जात होते. दै. ‘सकाळ’ने याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले असता हा कचरा २४ तासांतच उचलला होता.
आता याच रस्त्याच्या कडेला हळूहळू वाहने उभी राहू लागली आहेत. हा रस्ता कमी रहदारीचा असल्याने व रस्त्याकडेला मोकळी जागा असल्याने या मार्गिकेवर स्थानिक रहिवाशांव्यतिरिक्त इतर कोणीही वाहने उभी करतात, असेही सांगितले जाते. सायंकाळी हा रस्ता वाहनतळाचे स्वरूप घेतो. तर दिवसा रस्ता काहीसा मोकळा दिसतो. तरी भविष्यात हा रस्ता वाहनतळ बनायला नको, अशी अपेक्षा नागरिक करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेल दरवाढीचा चौथा धक्का! सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

सकाळच्या गडबडीतही फिट राहण्यासाठी झटपट, हेल्दी आणि एनर्जीने भरलेला पीनट-बटर-बनाना रॅप, ५ मिनिटांत होतो तयार

आजचे राशिभविष्य - २५ मे २०२६

Panchang 25 May 2026 : पंचांग! सोमवारचे शुभ मुहूर्त, राहुकाळ, चंद्रबळ आणि धार्मिक विशेष जाणून घ्या

आजचे पंचांग आणि दिनविशेष - २५ मे २०२६

SCROLL FOR NEXT