मुंबई

तळोजा एमआयडीसीत अकरा लाखांचा मद्यसाठा जप्त

CD

तळोजा एमआयडीसीत ११ लाखांचा मद्यसाठा जप्त
नवी मुंबई, ता. २६ (वार्ताहर) ः तळोजा एमआयडीसी परिसरात बनावट विदेशी मद्यविक्री करणाऱ्या टोळीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पनवेल ग्रामीण पथकाने कारवाई करीत ११ लाख ८५ हजार ५९५ रुपयांचा बनावट मद्यसाठा जप्त केला. या वेळी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली.
माहितीच्या आधारे पथकाने पेंधर येथील योगेश वजन काट्यासमोर शुक्रवारी रात्री सापळा रचून एक चारचाकी वाहन पकडले. वाहनाच्या तपासणीत १७ बनावट विदेशी मद्याच्या बाटल्या आणि दोन मोबाईल फोन असा ५.४४ लाखांचा मुद्देमाल सापडला. यानंतर पथकाने पेंधर येथील एका पत्र्याच्या खोलीवर छापा मारला. या वेळी ५४ उच्च प्रतिच्या बनावट मद्यासह ४२ विदेशी बाटल्या, रिकाम्या बाटल्यासह बनावट बूच, लेबल व इतर साहित्य असा ६.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत संतोष उरथ, बिजू उरथ आणि बिनू कल्लूर यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई निरीक्षक अनिल बिराजदार, दुय्यम निरीक्षक अजित बडदे, योगेंद्र लोळे, सहाय्यक निरीक्षक गैनिनाथ पालवे तसेच जवान निखिल पाटील व सचिन कदम यांनी संयुक्तपणे केली.
................
रेल्वे स्थानक परिसरात सिडकोची धडक मोहीम
तुर्भे, ता. २६ (बातमीदार) ः नवी मुंबईतील विविध रेल्वेस्थानकांच्या परिसरात सिडकोच्या सुरक्षा विभागाने विशेष मोहीम राबवत अनधिकृत फेरीवाले, गर्दुल्ले आणि वाहनतळांवर धडक कारवाई केली.
नेरूळ, सानपाडा, जुईनगर, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, सीबीडी बेलापूर या स्थानकांवरील पादचारी पूल, रेल्वेस्टेशनच्या बाजूंचे वाहनतळ तसेच परिसरात वावरणारे गर्दुल्ले, मद्यपी, फेरीवाले, अनधिकृत गाळेधारक व पार्किंग करणारे यांच्यावर या वेळी कारवाई करण्यात आली. या कारवाईत फेरीवाल्यांचे साहित्य जप्त करण्यात आले असून, परिसर स्वच्छ व अडथळामुक्त करण्यात आला. या कामगिरीबद्दल प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा अधिकारी आणि रक्षकांनी ही मोहीम पार पाडली. नागरिकांनी रेल्वे स्थानक परिसरात कोणतीही अवैध बाब आढळल्यास www.cidco.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर कळवावे, असे आवाहन मेंगडे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : कोरियन व्लॉगरसोबत भारतात घडली भयंकर घटना; “I hate India” म्हणत ढसाढसा रडली, तिच्यासोबत झालेल्या छळाचा व्हिडिओ व्हायरल

Pranjal Khewalkar: रेव्ह पार्टीत जावई अडकला; Eknath Khadse बघा काय म्हणाले? | Sakal News

एक-दोन नव्हे ३ ठिकाणी रंगली रात्र, खराडीआधी पब अन् फाइव्ह स्टारमध्ये पार्टी, छाप्यापर्यंत काय घडलं? टाइमलाइन आली समोर

Chh. Sambhajinagar News : मुलींना पालकांकडे परत पाठविण्याची घाई; विद्यादीप प्रकरणानंतर महिला बालविकास क्षेत्रात ‘भीती’

Latest Maharashtra News Updates: भुगावजवळ रस्त्यावर झाड कोसळले; गाडीत अडकलेले चौघे सुखरूप

SCROLL FOR NEXT