मुंबई

भिवंडीत सुधारित वीज दर लागू

CD

भिवंडी, ता. २८ (वार्ताहर) : महावितरणच्या वीजग्राहकांना सुधारित वीज दर १ जुलैपासून लागू करण्याच्या निर्णयाला मान्यता दिली आहे. यामुळे काही प्रमाणात वीज दरवाढ झाली असली, तरी ग्राहकांच्या मागणीनुसार आकारणीत सुसूत्रता आणली आहे. त्याचा फायदा वीजग्राहकांना होणार असल्याची माहिती भिवंडीत वीज वितरण करणाऱ्या टोरेंट पॉवर कंपनी व्यवस्थापनाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
नवीन सुधारित वीजदरानुसार दरमहा १०० युनिट्स वापरणाऱ्या निवासी ग्राहकांना नऊ टक्के कपात केली आहे. दरमहा १०० युनिट्सपेक्षा जास्त वापरणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या दरात ०.५ ते ३ टक्के वीज दरवाढ केली आहे. औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना ऊर्जा शुल्क कमी होणार असले, तरी निश्चित शुल्कामध्ये ४.५ टक्के वाढ करण्यात आली आहे.
व्हीलिंग चार्ज १.१७ रुपये प्रति युनिटवरून १.४७ रुपये करण्यात आले आहे. १ जुलैपासून २० केव्हीपेक्षा जास्त विद्युत दाब असलेल्या सर्व एलटी औद्योगिक, व्यावसायिक व सार्वजनिक सेवा ग्राहकांना केव्हीएएच वापरावर आधारित वीजबिल आकारले जाणार आहे. वीज ग्राहकांनी पॉवर फॅक्टर नियमित तपासा, कॅपेसिटर किंवा एपीएफसी पॅनल लावा व देखभाल करा, जेणेकरून पॉवर फॅक्टर शक्यतो एकजवळ राहील. पॉवर फॅक्टर योग्य न ठेवल्यास बिलामध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते, असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.
महावितरणकडून सुधारित बिल टोरेंट पॉवर कंपनी वीज वितरण करत असलेल्या भिवंडी आणि शीळ - मुंब्रा - कळवा येथील वीजग्राहकांनाही येणाऱ्या बिलांपासून लागू होणार आहेत. अधिक माहितीसाठी ग्राहकांनी कंपनीच्या सेवा केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन कंपनी व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.

सौर वापराबाबत बदल
वेळ सवलत/अधिभार
सकाळी ९ ते सायं. ५ एप्रिल-सप्टेंबर १५ टक्के, ऑक्टोबर ते मार्च २५ टक्के सवलत
सायं. ५ ते रात्री १२ व्यावसायिक : २५ टक्के, इतर ग्राहक २० टक्के अधिभार
रात्री १२ ते सकाळी ६ पूर्वी मिळणारी १.५० रुपयांची सवलत रद्द

इतर तात्पुरते बदल :
तीन ते सहा महिन्यांच्या संक्रमण कालावधीत सिस्टम आणि मीटर अपग्रेड होईपर्यंत सायंकाळी ६ ते रात्री १० दरम्यान १.३० रुपये प्रति युनिट अधिभार आकारला जाणार आहे..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MP Congress MLA Agitation : म्हशीच्या वेषात आले कॉंग्रेस आमदार, सहकाऱ्यांनी वाजवली पुंगी; अनोख्या आंदोलनाची होतेय चर्चा

Nashik News : नाशिकमध्ये हवाई हल्ल्याचा इशारा देणारे भोंगे बसणार; मनपाची तयारी सुरू

ENG vs IND: 'आरामखुर्चीत बसून मॅच पाहताना...' स्टोक्सवर टीका करणाऱ्यांना पीटरसनने सुनावलं; वाचा काय म्हणाला

Shaktipeeth Highway: ‘शक्तिपीठ’साठी चिंचोलीत पूजन करून जमीन मोजणी; शेतकऱ्यांचा मिळाला सकारात्मक प्रतिसाद

Koyna Dam: कोयना धरणाचे दरवाजे चार फुटांवर; पावसाचा जोर मंदावला, नदीपात्रात २१ हजार ८२४ क्युसेक विसर्ग

SCROLL FOR NEXT