मुंबई

‘कार रेल्वे’ सेवाचा फज्जा

CD

‘कार रेल्वे’सेवेकडे प्रवाशांची पाठ
आठवडाभरात केवळ एकच नोंदणी; चाकरमान्यांचा उत्साह कमी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेने सुरू केलेली ‘रो-रो’ म्हणजेच रेल्वे कारसेवेचा फज्जा उडाला आहे. कोलाड (रायगड) ते वेरणा (गोवा) यादरम्यान ही सेवा २३ ऑगस्टपासून सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती; मात्र आठवडाभरानंतरही यासाठी केवळ एकच नोंदणी झाली आहे. किमान १६ गाड्यांची नोंदणी न झाल्यास ही सेवा रद्द केली जाणार असल्याची माहिती कोकण रेल्वेच्या सूत्रांनी दिली.
देशात प्रथमच रेल्वेच्या माध्यमातून खासगी कार वाहून नेण्याची नुकतीच घोषणा करण्यात आली. कोकण रेल्वेच्या या उपक्रमात एका फेरीत ४० कार रायगडच्या कोलाड ते गोव्याच्या वेरणा स्थानकांदरम्यान नेण्यात येणार होती. गणेशोत्सवावेळी चाकरमान्यांची होणारी गर्दी लक्षात घेता ही पर्यायी वाहतूक व्यवस्था सुचवली होती.
------
प्रवाशांमध्ये संभ्रम, प्रश्न अनुत्तरित
गणेशोत्सवासाठी मुंबईहून रत्नागिरी, सावंतवाडीला जाणाऱ्या प्रवाशांचा मोठा ओघ असतो. या पार्श्वभूमीवर अनेकांनी या सेवेला रत्नागिरी किंवा सावंतवाडी येथे थांबा आहे का, असा प्रश्न केला; मात्र या ठिकाणी लोडिंग व अनलोडिंगसाठी आवश्यक सुविधा नसल्याने थांबा देणे शक्य नसल्याचे कोकण रेल्वेने म्हटले आहे. त्यामुळे अनेकांनी या सेवेकडे पाठ फिरवली आहे.
-----
वेळ आणि खर्चाचा फायदा नाही
प्रवाशांना स्वतःची कार कोलाड स्थानकावर घेऊन यावी लागणार आहे. तिथून ती रेल्वेने वेरणाला (गोवा) पोहोचवली जाईल. यासाठी  प्रत्येक कारचा खर्च ७,८७५ रुपये आहे.  प्रवाशांचे रेल्वे तिकीट स्वतंत्रपणे लागणार आहे. त्यामुळे सरासरी १० हजारांपर्यंत खर्च येणार आहे. तसेच लोडिंग आणि अनलोडिंगसाठी प्रत्येकी तीन तास आणि प्रवासाला १० ते १२ तास लागणार आहे.  त्यामुळे या सुविधेमुळे प्रवाशांचा ना वेळ वाचतो, ना खर्च कमी होतो. उलटपक्षी ही सेवा किचकट आणि खर्चिक वाटत असल्याचे मत चाकरमान्यांनी व्यक्त केले.
----
१३ ऑगस्टपर्यंत मुदत
कोकण रेल्वेने ११ सप्टेंबरपर्यंत ही सेवा पर्यायी दिवशी सुरू ठेवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे; मात्र त्यासाठी आवश्यक नोंदणी न मिळाल्यास ती फेरी रद्द करण्यात येणार आहे. १३ ऑगस्ट ही नोंदणीची अंतिम मुदत असून, तोपर्यंत मागणी न वाढल्यास ही सेवा पहिल्याच वर्षी गुंडाळण्याची नामुष्की कोकण रेल्वेवर येण्याची शक्यता आहे.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India reaction on Trump tariff: ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर फोडलेल्या टॅरिफ बॉम्बनंतर आता भारतानेही स्पष्ट केली भूमिका!

Jaya Bachchan warn Priyanka Chaturvedi: जया बच्चन राज्यसभेत बोलताना अचानक शेजारीच बसलेल्या प्रियंका चतुर्वेदींवर उखडल्या, म्हणाल्या...

Trumps Tariff Bomb: ट्रम्प 'टॅरिफ'मुळे भारताच्या टेक्सटाईल्स, फार्मासह 'या' ५ उद्योगांना बसणार फटका, पाहा संपूर्ण लिस्ट

Amit Shah Rajya Sabha Speech: ‘माझ्याशी तर निपटा, पंतप्रधानांना कशाला बोलावताय, आणखी त्रास होईल’’

Prakash Solanke: प्रकाश सोळंकेंनी गळाला लावलेले बाबरी मुंडे नेमके कोण? पंकजांसह धनंजय मुंडेंना जबरदस्त धक्का!

SCROLL FOR NEXT